पाणी आपल्या जीवनातील मुख्य आवश्यकता आहे. यामुळे असे म्हंटले गेले आहे कि पाणी हेच जीवन आहे. आपल्या शरीराचा जवळजवळ ७०% भाग पाणी आहे. यामुळे पाण्याला शरीरासाठी अमृत मानले गेले आहे. यामुळे तहान लागल्यास आवश्यकतानुसार पाणी जरूर पिले पाहिजे.

पाण्याच्या सेवनाने सर्व अवयव व्यवस्थितपणे काम करतात आणि यामुळे आपले अनेक आजार दूर होतात. आज आपण रात्री झोपताना पाणी पिल्याने शरीरामध्ये होणारे बदल जाणून घेणार आहोत. रात्री झोपताना पाणी पिणाऱ्या ९९% लोकांना हि सत्यता माहित नाही.

रात्री झोपतेवेळी थंड पाणी पिणे

रात्री झोपतेवेळी थंड पाणी किंवा इतर कोणतेही थंड पेय पिणे शरीरासाठी खूपच नुकसानदायक आहे. कारण रात्री थंड पाणी पिल्याने हे भोजनामधील तेलकट पदार्थांना ठोस बनवते. ज्यामुळे पचन क्रिया खराब होते आणि पोटामध्ये आम्लची मात्रा वाढू लागते. जे आतड्यांमध्ये जमा होते. ज्यामुळे हे ठोस पदार्थ चरबीचे रूप घेतात आणि यामुळे पोटाची चरबी वाढू लागते. यामुळे रात्री झोपताना चुकुनही थंड पाणी पिऊ नये.

रात्री झोपतेवेळी गरम पाणी पिणे

रात्री झोपतेवेळी गरम पाणी पिल्याने शरीरामध्ये डिटॉक्सची प्रक्रिया सहजपणे होते. ज्यामुळे शरीरामधील हानिकारक तत्व आणि अशुद्धी सहजपणे बाहेर निघून जाते. रात्री झोपताना गरम पाणी पिल्याने हृदयविकाराचा झटका, लठ्ठपणा, सांधेदुखी, केसांची समस्या, मासिक पाळीदरम्यान ब्लड सर्कुलेशन, सर्दी-खोकला आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. आपले शरीर स्वस्थ आणि ताजेतवाने राहते. यामुळे रात्री झोपतेवेळी एक ग्लास कोमट पाणी अवश्य प्यावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने