काळानुसार माणसामध्ये सवयी देखील बदलत जातात. लग्नानंतर देखील मुला-मुलींमध्ये अनेक बदल दिसून येतात. त्यांची बोलचाल, स्वभाव यामध्ये खूप बदल होतो. रिलेशनशिपमध्ये पडल्यानंतर देखील मुलींच्या अनेक सवयी बदलून जातात. चला तर जाणून घेऊया प्रेमामध्ये पडल्यानंतर मुलींमध्ये कोणते बदल होतात.

झोप: असे म्हंटले जाते कि मुली जेव्हा प्रेमामध्ये पडतात तेव्हा त्यांना झोप कमी येते. रात्री उशिरापर्यंत त्या फोनवर व्यस्त राहतात. इतकेच नाही तर काम सोडून त्या दिवसभर चॅटिंग आणि मोबाइलवरच आपल्या जास्त वेळ घालवत असतात.

सौंदर्य दाखवणे: रिलेशनशिपमध्ये पडल्यानंतर मुली आपल्या सौंदर्याकडे विशेष लक्ष देतात. त्या प्रत्येक वेळी आपल्या चेहऱ्यावर जास्त लक्ष देतात. दिवसामधून अनेक वेळा त्या मेकप करतात आणि आपला चेहरा आरश्यामध्ये न्याहाळत असतात.

मोबाईल लॉक ठेवतात: मुली ज्यावेळी रिलेशनशिपमध्ये पडतात त्यावेळी त्या आपला मोबाईल जास्तकरून लॉक ठेवतात. त्या कोणालाही आपल्या फोन हाताळू देत नाहीत. जेणेकरून त्यांच्या लाईफमधील सिक्रेट कोणालाही माहिती होऊ नये.

मित्रांपासून दूर: तसे तर प्रत्येकाचे खूप मित्र असतात. पण मुली ज्यावेळी रिलेशनशिपमध्ये पडतात तेव्हा त्या आपल्या रिलेशनबद्दल कोणालाही जास्त माहिती होऊ देत नाहीत. यामुळे त्या आपल्या मित्रांपासून देखील नेहमी दूर राहतात.

रोमँटिक गाणी ऐकणे: सुरुवातीला ज्या मुलीना रोमँटिक गाणी ऐकायला आवडत नाही अशा मुली जेव्हा रिलेशनशिपमध्ये पडतात तेव्हा त्या अचानक रोमँटिक गाणी ऐकू लागतात. लव्ह सॉंग त्यांचे आवडीचे सॉंग बनतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने