हिंदू धर्मामध्ये पत्नीला पतीची अर्धांगिनी देखील म्हंटले जाते, ज्याचा अर्थ हा होतो कि पती पत्नी हे शरीराचे अर्धे अर्धे अंग असतात. महाभारतामध्ये भीष्म पितामहने म्हंटले होते कि पत्नीला नेहमी प्रसन्न ठेवले पाहिजे कारण तिच्यापासूनच आपला वंश वाढत असतो. याशिवाय देखील अनेक ग्रंथांमध्ये पत्नीचे गुण आणि अवगुण विस्तारपूर्वक सांगितले गेले आहेत. यानुसार ज्या पत्नीमध्ये हे गुण असतील तिला भाग्यशाली मानले गेले आहे.
“सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रियंवदा। सा भार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता।।“ याचा अर्थ असा होतो कि जी पत्नी गृहकार्यामध्ये निपुण आहे, जी प्रियवदनी आहे, जिचा पतीच प्राण आहे आणि जी पतीची प्रत्येक गोष्ट ऐकते वास्तवात ती खरी पत्नी आहे.
गृह कार्यामध्ये निपुण म्हणजे घर सांभाळणारी
गृह कार्य म्हणजे घरचे काम, जी पत्नी घरची सर्व कामे जसे भोजन बनवणे, साफसफाई करणे, घर सजवणे, कपडे-भांडी स्वच्छ करणे, मुलांची जबाबदारी ठीकप्रकारे सांभाळणे, घरामध्ये आलेल्या पाहुण्याचे आतिथ्य करणे, कमी संसाधनामध्ये घर चालवणे ई. कामामध्ये निपुण असते. तिला गृह कार्यामध्ये निपुण मानले गेले आहे. ज्या पत्नीमध्ये हे गुण असतात अशी पत्नी पतीची प्रिय असते.
प्रियवदनी म्हणजे मधुर बोलणारी
पत्नीने कधीही आपल्या पतीशी संयमी भाषेमध्येच बोलले पाहिजे. संयमित भाषा म्हणजे हळू आवाजात आणि प्रेमाने बोलणे. पत्नी द्वारे अशाप्रकारे बोलण्याणे पती देखील तिची गोष्ट व्यवस्थित ऐकून घेतो आणि तिच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पतीशिवाय पत्नीने घरच्या इतर सदस्यांसोबत जसे सासू-सासरे, दीर-जाऊ, नणंद यांच्यासोबत देखील प्रेमाने बोलले पाहिजे. मधुर वाणीने पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे मन लगेच जिंकता येते.
पतिपरायणा म्हणजे पतीची प्रत्येक गोष्ट ऐकणारी
जी पत्नी आपल्या पतीला सर्वस्व मानते तथा नेहमी त्याच्या आदेशाचे पालन करते त्याला धर्म ग्रंथामध्ये पतिव्रता म्हंटले गेले आहे. पतिव्रता पत्नी नेहमी आपल्या पतीची सेवा करण्यात व्यस्त असते, चुकुनही ती कधी आपल्या पतीचे मन दुखावणारे काम करत नाही.
जर पतीला एखादी दुखाची गोष्ट सांगायची असेल तर ती देखील संयमित होऊन सांगते. ती नेहमी पतीला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पतीशिवाय ती इतर कोणत्याही पुरुषाबद्दल कधीच विचार करत नाही. धर्मग्रंथामध्ये अशा पत्नीला पतिपरायणा म्हंटले गेले आहे.
धर्माचे पालन करणारी
एका पत्नीचा सर्वात पहिला धर्म हा असतो कि तिने आपल्या पती आणि कुटुंबाच्या हिताबद्दल विचार करावा. असे कोणतेही काम करू नये ज्यामुळे पती आणि कुटुंबाचे अहित होईल. जी पत्नी नेहमी धर्माचे पालन करते तथा आपल्या पतीला प्रिय करते तिला खऱ्या अर्थाने पत्नी मानले गेले आहे. ज्याच्या पत्नीमध्ये हे सर्व गुण आहेत त्याला नेहमी भाग्यवान समजले जाते.
टिप्पणी पोस्ट करा