ज्योतिषशास्त्रामध्ये शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर पाल पडण्याच्या प्रभावाबद्दल सांगितले गेले आहे. यामध्ये काही वाईट प्रभाव आणि काही चांगले देखील सांगितले गेले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडल्याने कोणता प्रभाव होतो. त्याचे शुभ परिणाम मिळतात कि अशुभ परिणाम मिळतात.

पाल पडल्याने होतात हे लाभ

ज्योतिष शास्त्रानुसार जर पाल आपल्या डोक्यावर पडली तर याचे शुभ परिणाम मिळतात. तथापि डोक्यावर पाल पडल्यास लोकांची भीतीमुळे परिस्थिती खूप वाईट होऊन जाते. जर पाल आपल्या कपाळावर पडली तर लवकरच आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आपली भेट होऊ शकते याचे संकेत आहेत.

पाल आपल्या दोन्ही भुवयांच्या मधोमध पडली तर याचा अर्थ असा होतो कि सरकारी अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. जर पाल गळ्यावर पडली तर तुमच्या शत्रूंच्या नाश होऊ शकतो. पाल डोळ्यावर पडली तर धन संपत्तीमध्ये वृद्धी होते.

झोपताना आपल्या डाव्या कानावर पाल पडली तर लाभ होतो तर उजव्या कानावर पाल पडल्यास आपल्या आयुष्यामध्ये वृद्धी होते. जर पाल आपल्या डोळ्यावर पडली तर याचा अर्थ असा होतो कि लवकरच आपण धनवान बनणार आहात.

उजव्या हातावर पाल पडल्यास व्यक्तीच्या प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होते तर पाल पोटावर पडल्यास आभूषण प्राप्ती होते. जर पाल मांडीवर पडली तर व्यक्तीचे कल्याण होते. हनुवटीवर पाल पडल्यास याचा अर्थ असा होतो कि तुमचा शुभ संवाद होईल.

पाल पाहण्याचा शकून

घरामध्ये सामान्यत: आढळणारी पाल भविष्यामध्ये होणाऱ्या अनेक घटनांबद्दल संकेत देते. शकून शास्त्रानुसार दिवसा भोजन करताना जर पालीचा आवाज आल्यास लवकरच शुभ समाचार मिळू शकतात किंवा शुभ फळ प्राप्ती होऊ शकते.

जर पाल भांडण करताना पाहायला मिळाली तर आपले दुसऱ्याशी भांडण संभव आहे किंवा एखाद्या प्रियजनापासून विभक्त होण्याचे दुख सहन करावे लागू शकते. यासोबत संक्रांतीच्या दिवशी जर घरामध्ये पाल दिसली तर हे खूप शुभ आहे.

असे मानले जाते कि पूर्ण वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी बनून राहील. पण आपण पालीसंबंधी असा उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने शुभ लाभ मिळतो आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते. संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये पाल दिसल्यास करा हा उपाय.

तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे कि भिंतीवर पाल दिसली तर देवघरामध्ये ठेवलेले कुंकू आणि तांदूळ घ्या आणि हे लांबूनच पालीवर टाकून द्या. असे करताना मनामध्ये एखादी मनोकामना देखील बोला आणि प्रार्थना करा कि हे कामना पूर्ण व्हावी.

वास्तविक शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे कि संक्रांतीच्या दिवशी पालीची पूजा केल्याने धन संपत्ती संबंधी समस्यांचा अंत होतो आणि धन प्राप्तीचे नवीन मार्ग प्राप्त होतात. ज्यामध्ये आपल्या आर्थिक समस्या दूर होतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने