जुन्या ग्रंथामध्ये आपल्याला असे काही उल्लेख आढळून येतात जे मनुष्याच्या आयुष्याशी संबंधित असतात. जर या गोष्टी आपण अमलात आणल्या तर आपले आयुष्य सुखी होऊन जाते. आज आपण अशाच काही ५ सुखांबद्दल जाणून घेणार आहोत जे फक्त नशिबावान लोकांनाच मिळतात. चला तर जाणून घेऊया ते कोणते ५ सुख आहेत.

पहिले सुख: पोटभरून भोजन करण्याचे आणि चांगल्या प्रकारे ओळखण्याचे सुख प्रत्येकाला मिळत नाही. तुम्ही हे देखील नोटीस केले असेल कि काही लोकांजवळ खूप पैसा असतो. त्यांना पाहिजे तेवढे आणि काहीही खाण्याचे खरेदी करू शकतात.

तथापि त्यांना असलेल्या आजारामुळे आणि इतर कारणांमुळे त्यांना ते पचवण्याची ताकद नसते. तर दुसरीकडे काही लोकांचे पाचन तंत्र खूप मजबूत असते पण त्यांच्याजवळ पैशांची कमी असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांना दररोज पोटभरून अन्न मिळत नाही.

दुसरे सुख: जर तुम्हाला स्वादिष्ठ आणि गरमा-गरम भोजन प्राप्त होत असेल तर तुम्ही खूपच भाग्यशाली आहात. विश्वास ठेवा जगामध्ये असे बरेच लोक आहेत त्यांना हे सुख दररोज प्राप्त होत नाही. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि यामध्ये श्रीमंत लोक देखील सामील आहेत.

तिसरे सुख: घरामध्ये वादाचे कारण भांडखोर पत्नी देखील असते. यामुळे व्यक्ती खूप दुखी देखील होतो. पण जर पत्नी प्रेमळ आणि स्नेह भाव असणारी असेल तर तो व्यक्ती खूपच सुखी व्यक्ती आहे. अशी पत्नी फक्त नशीबवान लोकांनाच मिळते.

चौथे सुख: तुम्ही कितीही म्हणा पण जीवनामध्ये पैसाच सर्वकाही असू शकत नाही. पण सत्य तर हे आहे कि पैशांशिवाय व्यक्ती सुखी देखील राहू शकत नाही. पैशांअभावी व्यक्ती अनेक भौतिक सुखांपासून वंचित राहतो. इतकेच नाही तर काही ग्रंथांमध्ये देखील धनहीन व्यक्तीला मृतक समान सांगितले गेले आहे. यामुळे ज्या व्यक्तीजवळ जीवनामध्ये खूप पैसा आहे तो व्यक्ती खूप सुखी राहतो.

पाचवे सुख: धन दान करण्याचा उत्साह आणि मन देखिक क्वचितच लोकांकडे असतो. जो व्यक्ती खूप दानधर्म करतो तो देखील सुखी आणि खूप नशीबवान आहे. त्याला हि गोष्ट माहिती असते कि त्याच्या धनाचा योग्य वापर होत आहे. अशामध्ये त्याला आपले धन नष्ट होण्याची किंवा चुकीच्या हातामध्ये जाण्याची भीती राहत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने