महिला आणि पुरुषांशिवाय आणखी एक वर्ग देखील असतो ज्यांना आपण किन्नर म्हणून ओळखतो. किन्नरला आजच्या काळामध्ये थर्ड जेंडर म्हणून संबोधले जाते. किन्नरांची ओळख त्यांच्या नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या समुदायाच्या रुपामध्ये केली जाते.

किन्नर कधीच आईवडील बनू शकत नाहीत. किन्नर दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपले पोट भरतात. जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये एखादे मुल जन्माला येते किंवा लग्नाचे वातावरण असते तेव्हा घरामध्ये खुशहाली म्हणून पैसे मागण्यासाठी जातात आणि किन्नरांना खुश ठेवण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात. असे म्हंटले जाते कि किन्नरांना कधीच निराश करू नये.

किन्नरांच्या देवाबद्दल बोलायचे झाले तर हि कोणीही सामान्य व्यक्ती नाही तर किन्नरांची देवता अर्जुन आणि नाग कन्या उलूपीची संतान इरावन आहे ज्याला लोक अरावन म्हणून देखील ओळखतात. इरावन किन्नरांचे देवता कसे बनले आणि एका रात्रीसाठी लग्न करतात याचा सरळ संबंध महाभारतच्या युद्धाशी जोडला गेला आहे. हे सांगण्याअगोदर हे देखील जाणून घेऊया कि यांचे लग्न कुठे होते आणि लग्नानंतर काय होते.

तुम्ही किन्नरांबद्दल ऐकले असेल पण आज आपण जे जाणून घेणार आहोत ते तुम्ही याआधी कधीच वाचले आणि ऐकले नसेल. किन्नरांच्या लग्नाबद्दल सांगितले जाते कि किन्नर फक्त एका रात्रीसाठीच लग्न करतात आणि त्यांचे लग्न त्यांच्या देवासोबत होते. चला तर जाणून घेऊया कोण आहे त्यांची देवता आणि किन्नर देवाच्या मूर्तीसोबत करतात लग्न.

किन्नरांच्या लग्नाचा उत्सव तामिळनाडूच्या कुवगानमध्ये होतो. इथे प्रत्येक वर्षी तमिळ नव वर्षाच्या पहिल्या पौर्णिमापासून किन्नरांच्या लग्नाचा उत्सव सुरु होतो. जो १८ दिवसांपर्यंत चालू असतो. ज्यामध्ये १७ व्या दिवशी किन्नर लग्न करतात.

सोळा शृंगार केलेले किन्नर मंगळसूत्र घालून लग्नासाठी जातात आणि नंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी इरावन देवताची पूजा केली जाते आणि पूर्ण शहरामध्ये देवाच्या मूर्तीला फिरवले जाते आणि यानंतर ती मूर्ती तोडून टाकली जाते.

ज्यानंतर सोळा शृंगार केलेले किन्नर आपला शृंगार काढून विधवाचे रूपामध्ये शोक व्यक्त करतात. ज्यानंतर ते नेहमी एक विधवा म्हणून आयुष्य घालवतात. चला तर जाणून घेऊया लग्नापासून ते विधवा होण्यापर्यंतचे संपूर्ण सत्य.

महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी माता कालीची पूजा केली होती. या पूजेमध्ये एक राजकुमारची बली द्यायची होती. जेव्हा कोणीही राजकुमार आपली बली देण्यास तयार झाला नाही तेव्हा इरावन म्हणजे किन्नरच्या देवताने म्हंटले कि मी बली देण्यास तयार आहे.

पण बलीपूर्वी त्याने एक अट ठेवली होती कि तो लग्नाशिवाय बली जाणार नाही. ज्यानंतर पांडवांजवळ कोणताही मार्ग राहिला नाही कि कोणती राजकुमारी इरावनसोबत लग्न करेल आणि दुसऱ्या दिवशी विधवा होईल.

यादरम्यान श्रीकृष्णाने हि समस्या सोडवली आणि स्वतः मोहिनीचे रूप धारण करून इरावन सोबत लग्न केले. दुसऱ्या दिवशी इरावनने बली दिले आणि श्री कृष्णाने विधवा बनून शोक व्यक्त केला. या घटनेनंतर किन्नर इरावनला आपला देवता मानू लागले त्याचबरोबर त्याची नेहमी पूजा करतात आणि प्रत्येक वर्षी तमिळ नववर्षाच्या पौर्णिमेला लग्न करतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने