हिंदू धर्माला मानणारे लोक दररोज तुळशीच्या रोपाची पूजा करतात. हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्व दिले गेले आहे. धार्मिक मान्यतांनुसार विष्णूदेव म्हणजे शालिग्रामसोबत तुळशीची पूजा केली जाते, तुळशीच्या पानांशिवाय विष्णूदेवाची पूजा अपूर्ण मानली जाते.

अनेक शुभ कामे करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो. धार्मिक महत्वासोबत आयुर्वेदाच्या बाबतीत देखील तुळशीचा वापर केला जातो. तुळशीचे रोप औषधी गुणांनी भरपूर असते. जर तुळशीचे दररोज सेवन केले तर यामुळे आरोग्यास अनेक फायदे मिळतात.

शास्त्रामध्ये याचा उल्लेख केला गेला आहे कि ज्या घरच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप लावलेले आहे त्या घरामधील नकारात्मक उर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो. इतकेच नाही तर तुळशीचे काही विशेष उपाय केले तर व्यक्तीचे भाग्य देखील चमकू शकते आणि सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी: धार्मिक मान्यतांनुसार ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा राहते त्या व्यक्तीच्या जीवनामधील धनासंबंधीच्या समस्य दूर होतात. माता लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला कामामध्ये सतत सफलता मिळते. जर तुम्हालाही वाटत असेल कि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर देखील राहावी तर यासाठी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाच्या मातीमध्ये १ रुपयाचे नाणे दाबा. हा साधारण उपाय केल्यास धनामध्ये बरकत होते.

बिघडलेली कामे पूर्ण होण्यासाठी: जर तुम्ही एखाद्या कामामध्ये खूप मेहनत करत असाल पण तुमचे ते काम पूर्ण होता होता राहत असेल तर अशा स्थितीमध्ये तुळशीचा हा उपाय करावा. तुम्ही दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर एक दिवा लावावा. हा उपाय केल्याने तुमचे नशीब उजळून जाईल आणि बिघडलेली कामे मार्गी लागतील.

ग्रहांच्या शांतीसाठी: ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह अशुभ प्रभाव देत असेल तर यामुळे जीवनामध्ये अनेक समस्या उत्पन्न होऊ लागतात. जर ग्रहांची स्थिती शांत असेल आणि देवाची कृपा तुमच्यावर बनवून ठेवायची असेल तर स्नान केल्यानंतर दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला जल अर्पित करावे. यामुळे ग्रह शांत होतील.

पितृ दोष दूर करण्यासाठी: असे मानले जाते कि पितृ दोषमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक कष्ट उत्पन्न होऊ लागतात. जर तुम्हाला पितृदोषामधून मुक्ती मिळवायची असेल तर तुळशीच्या रोपाच्या बाजूला काळ्या धोत्र्याचे रोप लावावे आणि दररोज याला कच्चे दूर अर्पित करावे. यामुळे लाभ मिळेल.

मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी: सध्याच्या काळामध्ये लोक मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी खूप धावपळ करतात पण त्यांना नोकरी मिळत नाही. जर तुमच्यासोबत देखील असे होत असेल तर आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुळशीच्या रोपाच्या खाली एक छोटे शिवलिंग ठेवा आणि त्यावर दररोज जल अर्पित करा आणि दिवा लावा. यामुळे आपल्याला खूपच लवकर फायदा पाहायला मिळेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने