झेंडूच्या फुलाचा वापर सामान्यत: पूजेमध्ये आणि घर सजवण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का कि चांगला सुगंध देण्यासोबत स्कीनच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील झेंडू फायदेशीर आहे.

झेंडूमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवर ग्लो आणण्यासोबत पिंपल्स, सुरकुत्या ई. मध्ये फायदेशीर ठरतात. आज आपण झेंडूच्या फुलापासून होममेड पॅक कसा बवतात ते जाणून घेणार आहोत जे तुमच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालू शकते.

ऑयली स्किनसाठी बेस्ट

१ चमचा झेंडूच्या फुलाची पेस्ट घ्या त्यामध्ये १ चमचा दही, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा गुलाब जल चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. हे फेस पॅक चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा. फेस पॅक सुखल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यामधून दोन वेळा याचा वापर केल्यास ऑयली स्किनची समस्या दूर होईल.

टॅनिंग दूर करते

१ चमचा झेंडूच्या फुलाची पेस्ट, थोडी हळद, अर्धा चमचा दुधाची क्रीम आणि अर्धा चमचा मध मिसळून याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. हि पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटे लावून ठेवा. फेस पॅक सुखल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. याच्या नियमित वापराने चेहऱ्याच्या टॅनिंगवर याचा प्रभाव दिसू लागेल.

मस दूर करते

झेंडूचे फुल स्कीनवर असणारे मस सहजपणे दूर करण्यास मदत करणे. यासाठी झेंडूच्या फुलाच्या काही पाकळ्या वाटून एक स्मूद पेस्ट तयार करा. याला १५ दिवस दररोज मसवर लावा. असे केल्यास लवकरच आपल्याला मसपासून सुटका मिळेल.

ग्लोइंग स्किनसाठी

बदामाच्या तेलामध्ये झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या टाका. याला जवळ जवळ १५ दिवसांपर्यंत तसेच ठेऊन द्या यानंतर एका कपड्याच्या मदतीने हे मिश्रण गाळून घ्या. झेंडूच्या फुलाने तयार केलेले हे तेल दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर लावा. सकाळी उठताच आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्या. कोरड्या त्वचेसाठी हे तेल खूप फायदेशीर ठरते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने