ऑफिसमधून निघाल्यानंतर हेडफोन लावून गाणे ऐकणे, स्वयंपाक बनवताना हेडफोन लावून गाणे ऐकणे, इतकेच नाही तर जेवण करताना आणि झोपताणा देखील हेडफोनचा वापर करण्याची क्रेज खूपच वाढत चालली आहे.

मोठेच नाही तर छोटी-छोटी मुले देखील हेडफोनचा वापर पूर्ण दिवस करत असतात. सर्वात जास्त हैराणी तेव्हाच होते जेव्हा लोक आपला हेडफोन दुसऱ्यासोबत शेयर करतात आणि दुसऱ्याचा हेडफोन देखील युज करतात. जर तुम्ही देखील असे करत असाल तर याचे नुकसान देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

एका संशोधनानुसार हेडफोनचा वापर जास्त केल्याने आपले कान देखील खराब होऊ शकतात. व्यक्तीच्या ऐकण्याची क्षमता निश्चित असते आणि एक मर्यादित आवाजापेक्षा जास्त जर ती व्यक्ती दररोज ऐकत असेल तर अशामध्ये समस्या होऊ शकते.

दररोज मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात ऐकत राहिल्यास त्याचा व्यक्तीच्या कानावर वाईट परिणाम होतो. जर एखादी व्यक्ती ९० डेसीबल पेक्षा जास्त आवाज दररोज ऐकत असेल तर हे संभव आहे कि ती व्यक्ती लवकरच आपली ऐकण्याची शक्ती गमावू शकतो.

हेडफोनचा जेव्हा आपण व्हॉल्यूम वाढवत असतो तेव्हा त्यादरम्यान आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळत असते. ज्यामध्ये हे लिहिलेले असते कि एका लिमिटपेक्षा जास्त आवाजामध्ये गाणी ऐकणे कानासाठी चांगले नाही.

जर तुम्ही या नोटिफिकेशनकडे दुर्लक्ष करत असाल तर निश्चितच तुम्ही आपल्या आयुष्यासोबत छेडछाड करत आहात. अशामध्ये तुमच्या कानाला गंभीर इजा होऊ शकते आणि तुमचे कान लवकर खराब होण्याचा धोका जास्त असतो.

जर तुम्हाला दुसऱ्याचे हेडफोन वापरणे गरजेचे असेल तर अशामध्ये सर्वात प्रथम ते हेडफोन चांगल्याप्रकारे स्वच्छ करून घ्या. कारण हेडफोनच्या द्वारे आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचण्यास जास्त वेळ लागत नाही. हेडफोनचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करावा आणि एका निश्चित आवाजामध्येच हेडफोन वापरण्याचा प्रयत्न करावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने