हिंदू धर्मामध्ये प्रत्येक क्रियेला एक वेगळे महत्व आहे आणि अशा क्रियेमध्ये जेव्हा एखादी महिला गर्भ धारण करते तेव्हा तिच्या मुलाच्या जन्माला एक उत्सव म्हणून साजरे केले जाते. हा क्षण सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा असतो तितकाच कौटुंबिक दृष्टिकोनातून देखील खूपच महत्वाचा असतो. बाळाचा जन्म प्रत्येक आई-वडिलांना एक नवीन जीवन देतो.

घरच्या वडिलधाऱ्या व्यक्तींसाठी हा क्षण अत्यंत महत्वपूर्ण आणि सुखदायक असतो कारण हे या गोष्टीचे संकेत असते कि त्यांचा वंश आता पुढे जाणार आहे. यामुळे आपल्या शास्त्रामध्ये येणारा काळ बाळ आणि महिला दोघांसाठी चांगला राहावा यासाठी अनेक नियम बनवले गेले आहेत.

पण सध्याच्या काळामध्ये मॉडर्न जनरेशन याला रूढीवादी किंवा अं’ध’श्र’द्धा मानतात. पण आज आपण जाणून घेणार आहोत कि याला एक वैज्ञानिक कारण देखील आहे ज्यामुळे गर्भवती महिलांना मृत व्यक्तीच्या जवळ जाऊ दिले जात नाही.

ज्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या घरामधील पूर्ण वातावरण शोकाकुल होते आणि खूपच निगेटिव देखील होते. वातावरणामध्ये पसरलेल्या नकारात्मकतेचा सरळ प्रभाव मुलावर देखील पडतो. कारण गर्भामध्ये वाढत असलेले बाळ खूपच संवेदनशील असते. बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे याचा सरळ प्रभाव गर्भामध्ये वाढत असलेल्या बाळावर पडतो. जे बाळासाठी खूप हानिकारक असते.

दुसरे कारण हे देखील आहे कि ज्या घरामध्ये व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा श’व ठेवले जाते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात आणि गर्भवती स्त्रीची रोग प्रतिरोधक क्षमता खूपच नाजूक असते, ज्यामुळे असे बॅक्टेरिया गर्भामधील बाळाला नुकसान पोहोचवू शकतात. यामुळे गर्भवती स्त्रीला अशा ठिकाणी जाण्यास वर्जित केले जाते.

जर मनोवैज्ञानिक दृष्टिने पाहिले तर स्त्रीचे मन खूपच कोमल असते आणि ती अशा परिस्थितीमध्ये खूप जास्त व्याकूळ होते. गर्भावस्थामध्ये ती भावनात्मक रूपाने अधिक कमजोर अनुभव करते. अशा अवस्थेमध्ये शोकाकुल कुटुंबामध्ये जाण्याने तिच्यावर अधिक तणाव येऊ शकतो ज्याचा विपरीत परिणाम तिच्या बाळावर होऊ शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने