ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते कि घरामध्ये होत असलेल्या घटना आपल्याला कोणत्याना कोणत्या गोष्टीचे संकेत देत असतात. मग हातामधून भांडे पडणे, काच तुटणे किंवा दुध उकळून सांडणे असो. या सर्व गोष्टींचा आपला एक संकेत असतो.

या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये होणाऱ्या घटनांबद्दल संकेत देतात. अनेक वेळा हि भविष्यवाणी इतकी अचूक असते कि आपले डोळे देखील धोका खातात. हीच गोष्ट लक्षात घेऊन आज आपण दुध उकळून भांड्याच्या बाहेर सांडण्याचे कोणते संकेत आहेत ते पाहणार आहोत.

दुधाचे सांडणे देते हे संकेत

आपण जेव्हा दुध उकळायला ठेवतो तेव्हा अनेक वेळा योग्य वेळी गॅस बंद न केल्यामुळे दूध उकळून खाली सांडते. अनेक लोक याला सामान्य समजून याकडे दुर्लक्ष करतात. तर काही लोक असे देखील आहेत कि कंफ्यूज होतात कि दुधाचे अशाप्रकारे सांडण्याचा काय संकेत आहे.

थंड दुध सांडणे असते अपशकून

आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये दुधाच्या सांडण्याला खूप महत्व दिले गेले आहे. काही लोकांचा मनामध्ये हा भ्रम असतो कि उकळते दुध सांडल्याने अपशकून होतो. पण तुमची हि दुविधा दूर करत हे समजून घ्या कि दुधाचे सांडणे तेव्हाच अपशकून मानले जाते जेव्हा थंड दुध ग्लास किंवा भांड्यामधून खाली पडून सांडते.

उदाहरणासाठी जेव्हा तुमची लाथ दुधाच्या भांड्याला लागते किंवा तुमच्या हातामधून दुधाचे भांडे निसटून खाली पडते तेव्हा हा अपशकून असतो. यासाठी अशा स्थिती मध्ये जर तुमच्याकडून दुध सांडले तर हा चिंतेचा विषय होऊ शकतो.

उकळते दुध भांड्यामधून बाहेर येणे असते शकूनची निशाणी

पण उकळत्या दुधाचे भांड्याच्या बाहेर येणे एक मोठा शकून मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जर दुध उकळून भांड्यामधून बाहेर पडले तर समजून जा कि तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे. या स्थितीमध्ये दुध जळले नाही पाहिजे आणि उकळून भांड्याच्या बाहेर पडले पाहिजे.

हि गोष्ट लक्षात राहू द्या कि हा शकून तेव्हाच मानला जातो जेव्हा आपण दुध गरम करताना पूर्ण केयर करतो पण चुकून आपले लक्ष राहत नाही आणि दुध उकळून बाहेर सांडते. जाणीवपूर्वक दुध उकळून बाहेर सांडू दिल्यास हे शकूनमध्ये येत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने