बऱ्याचदा लोक काही गरजेच्या वस्तू खरेदी करू शकत नाहीत आणि त्यांना थोडी मेहनत करून सर्व काही भागवावे लागते. आता लवकरच गरमीचे दिवस सुरु होणार आहेत. ज्यांच्या घरामध्ये फ्रीज नाही त्यांचा पूर्ण दिवस खाण्यापिण्याच्या वस्तूंना गरम करण्यामध्येच जातो. एकदा जेवण केले कि ते दुपारी गरम केले नाही तर ते लवकर खराब होऊन जाते.

गरमीच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त दुध फुटण्याची समस्या होते. फ्रीज नसल्यास दुध दिवसामधून २-३ वेळा चांगले उकळून ठेवावे लागते. अशामध्ये आपला वेळ देखील वाया जातो. पण आज आपण गरमीच्या दिवसांमध्ये काही खाण्यापिण्याच्या वस्तू स्टोर करण्याची खास पद्धती जाणून घेणार आहोत जे तुम्ही एकदा तरी वापरून पहाव्यात.

गरमीच्या दिवसामध्ये जास्त तापमानामुळे लोकांचे फ्रीज देखील खराब होतात आणि एक दिवस फ्रीज खराब झाले तर खूप सारे नुकसान होते. फ्रीजमध्ये दुर्गंधी देखील येऊ लागते. यामागे एक कारण फ्रीजमध्ये समान ठेवण्याचे देखील असते. जास्त सामानामुळे फ्रीजमध्ये हवा खेळती राहत नाही.

चिकन आणि मटन फ्रीजशिवाय स्टोर करणे खूपच सोपे आहे. एकदा चिकन आणि मटनामधील सर्व पाणी काढून टाका. जेणेकरून त्यामधील सर्व बॅक्टेरिया निघून जावेत. त्यानंतर याला मायक्रोवेव्हमध्ये फ्राय करून घ्या. एक वाटीमध्ये ठेऊन सुती कपड्याने झाकून ठेवा.

तसे तर गरमीमध्ये नेहमी ताज्या भाज्या घेऊन खाल्ल्या पाहिजेत. जर तुम्ही जास्त भाज्या घेऊन येत असाल आणि तुमच्याकडे फ्रीज नसेल तर त्या कापून उन्हामध्ये वाळवून जास्त दिवस ठेऊ शकता. भाज्या सुखवल्याने त्यांचा स्वाद आणखीनच वाढतो.

गरमीमध्ये सर्वात जास्त समस्या दुधाची होते. गरमीमध्ये दुध जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी ते चांगले उकळून घ्या आणि नंतर त्यामध्ये एक चमचा मध टाका. अथवा बाजारामधून बर्फ घेऊन ते एका भांड्यामध्ये ठेवावे आणि त्यामध्ये दुधाचे भांडे ठेवावे.

दही बॅक्टेरियापासून वाचवण्यासाठी यामध्ये दोन तीन चमचे मध मिसळावा. हा उपाय खाद्य पदार्थांना नैसर्गिक रूपाने वाचवून ठेवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. कोथिंबीरीची मुळे तोडून कोथिंबीर एका ग्लासमध्ये ठेवावी आणि यामध्ये थोडे पाणी टाकावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने