रात्री, आपण बऱ्याचदा कुत्री रडण्याचा आवाज ऐकत असतो, ज्यामुळे आपल्याला बर्याूचदा भीती वाटते आणि काहीवेळा आपण त्या ठिकाणाहून कुत्र्यांना हाकलून देतो. कारण कुत्र्याचा रडण्याचा आवाज हा आपल्यासाठी अशुभ मानला जातो.

इतर धर्मांप्रमाणेच हिंदू धर्मामध्ये देखील अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. यामध्ये काही गोष्टींना शुभ मानले गेले आहे तर काही गोष्टींना अशुभ मानले गेले आहे. अंध विश्वास एक अशी धारणा आहे जी लोकांमध्ये जुन्या काळापासून आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांनी आपल्या सोईनुसार ठेवल्या आहेत. जसे कि काच तुटली तर अशुभ मानले जाते तर मांजर आडवे गेले तर काही अशुभ घडणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आज देखील मानल्या जातात आणि त्यांचे पालन देखील केले जाते.

अशा अनेक अधंविश्वासाच्या गोष्टी आहेत आणि अनेक विचित्र धारणा आहेत कि जर कुत्रे रात्री रडू लागले तर एखाद्याचा मृत्यू जवळ आलेला असतो आणि त्याचबरोबर अशा अनेक विचित्र गोष्टी आहेत. हे देखील म्हंटले जाते कि जेव्हा देखील कुत्रे रडत असतात तेव्हा तेथून एखादा व्यक्ती जात असेल तर त्याने तेथून लवकरच जाणेच उचित समजले जाते.

माहितीनुसार अशा कोणत्याही वास्तवामध्ये अशुभ घडणाऱ्या गोष्टी नसतात. या सर्व धारणा लोकांनी बनवलेल्या आहेत. रात्री कुत्रे रडण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. कुत्री जेव्हा एकटे असतात किंवा त्यांना एकटेपणा जाणवतो तेव्हा ते बऱ्याचदा रडायला सुरु करतात.

पण बरेच जाणकार लोक असेही सांगतात की जेव्हा कुत्रा जोडीदार शोधत असतो तेव्हा त्याला त्याच्या कमतरतेमुळे त्रास होतो आणि कुत्रा जोडीदाराला बोलावण्यासाठी मोठ्याने ओरडतो आणि मोठ्याने रडतो. पण अनेक शास्त्रज्ञांचा असा दावा व विश्वास आहे की जेव्हा कुत्रा रडतो तेव्हा त्याला भूक लागण्याचे कारण देखील असू शकते. कारण भूक लागल्याने कुत्रा रडत असतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने