प्रत्येकाच्या घरामध्ये चहा तर बनतोच. मग तो ग्रीन टी असो किंवा ब्लॅक टी किंवा दुधाचा असो. चहा बनवल्यानंतर आपण चहापत्ती फेकून देतो. आपल्याला हे माहिती नसते कि युज झाल्यानंतर चहापत्तीचे काय करावे, यामुळे लोक नेहमी चहापत्ती कचऱ्यामध्ये फेकून देतात.

तुम्हाला माहिती आहे का कि या चहापत्तीचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो. जो फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर घरच्या इतर कामांसाठी देखील फायदेशीर ठरतो. आज आपण जाणून घेणार आहोत कि चहापत्तीचा पुन्हा वापर कसा करावा.

चहापत्तीचे फायदे

केसांमध्ये चमकदारपणा आणण्यासाठी युज होणारी चहापत्ती खूपच फायदेशीर असते. हे एक प्रकारे नैसर्गिक कंडिशनरचे काम करते. शिल्लक राहिलेली चहापत्ती एकदा चांगली धुवून घ्या आणि हि पुन्हा पाण्यामध्ये उकळून घ्या आणि नंतर या पाण्याने आपले केस स्वच्छ करून घ्या. नियमित असे केल्याने केसांमध्ये नैसर्गिक चमकदारपणा येईल.

आपल्या बगिच्यामध्ये लावलेल्या झाडांना वेळोवेळी खताची आवश्यकता असते. अशामध्ये शिल्लक राहिलेली चहापत्ती चांगली स्वच्छ करून घ्या आणि हि चहापत्ती झाडांना खत म्हणून टाका. यामुळे आपली झाडे नेहमी निरोगी राहतील.

चहापत्तीचा एक फायदा हा देखील आहे कि याला लाकडापासून बनवलेल्या वस्तूंना चमकदार बनवण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. शिल्लक राहिलेली चहापत्ती पुन्हा पाण्यामध्ये उकळून घ्या आणि याला बाटलीमध्ये किंवा स्प्रेमध्ये भरा. आता याने लाकडापासून बनलेल्या सामानाची सफाई करा. यामुळे वस्तू चमकू लागतील.

चहापत्ती घाव लवकर बरे करण्यासाठी आणि त्यांना भरण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरते. चहापत्ती अँटिऑक्सिडेंट असते. जर तुम्हाला जखम झाली तर त्यावर चहापत्ती लावा यामुळे जखम लवकर ठीक होईल. नंतर तुम्ही चहापत्तीच्या पाण्याने जखम धुवू शकता. यामुळे संसर्गापासून आपले संरक्षण होते.

चहापत्तीचा वापर काबुली चणे बनवण्यासाठी देखील करू शकता. यासाठी तुम्ही चहापत्ती चांगली वाळवून घ्या आणि काबुली चणे बनवतेवेळी उकळत्या पाण्यामध्ये चहापत्तीची पिशवी त्यामध्ये घाला. असे केल्याने काबुली चण्यांचा रंग अधिक गडद आणि आकर्षक दिसतो.

बनवलेल्या चहाची पत्ती पुन्हा पाण्यामध्ये टाकून चांगली उकळून घ्या. या पाण्याने तूप आणि तेलाचे डब्बे स्वच्छ करा. यामुळे डब्यामधील दुर्गंधी निगुन जाते. ज्या ठिकाणी माश्या बसत आहेत तिथे धुतलेली चहापत्ती ओळी करून चांगली रगडा. चहापत्तीमध्ये थोडे विम पावडर घालून क्रोकरी स्वच्छ करा ते चमकू लागेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने