एखाद्याला तुम्ही जवळून ओळखत असाल तर त्याच्या स्वभावाबद्दल तुम्ही लगेच सांगू शकता. पण हस्तरेषा शास्त्रामध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्याद्वारे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या बोटाचा आकार पाहून देखील त्याच्याबद्दल बरेच काही सांगू शकता.

वरती तुमच्यासमोर बोटांचे तीन आकार दिले गेले आहेत. आता तुम्हाला यामधील आपले बोट किंवा आपल्या परिचित व्यक्तीचे बोट ओळखायचे आहे. ज्यावरून तुम्ही त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकता.

‘ए’ – जर तुमचे बोट ‘ए’ आकाराच्या मिळते जुळते असेल तर याचा सरळ अर्थ हा होतो कि तुम्ही आपल्या भावनांना सर्वांपासून लपवून आणि सांभाळून ठेवणाऱ्यांपैकी आहात. तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबत आपल्या मनातील गोष्ट सांगण्यास संकोच करता आणि आतमधून तुम्ही स्वतःला शांत प्रदर्शित करता. तुम्ही स्वतःला खूप मजबूत प्रदर्शित करता. तुम्हाला खोटे सहन होत नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये खरेच ऐकणेच पसंत करता.

‘बी’ – ज्या लोकांचे बोट चित्रामध्ये सांगितलेल्या बी’ आकाराच्या बोटासारखे दिसते ते कोणालाही भेटण्यास जास्त उताविळपणा दाखवत नाहीत. या लोकांची कल्पनाशीलता कमालीची असते आणि नेहमी हे दिवसा देखील स्वप्ने पाहत राहतात. तसे हे काही करण्यास घाबरतात पण एकदा निश्चय केला तर हे ते कार्य पूर्ण करूनच शांत बसतात. तुम्ही दिसायला असंवेदनशील व्यक्ती दिसता पण वास्तवात तुम्ही तसे नाही आहात.

‘सी’ – जर तुमच्या बोटाचा आकार चित्रामध्ये दाखवलेल्या ‘सी’ बोटाप्रमाणे आहे तर तुम्ही निश्चित रूपाने कोणालाही आपल्या भावना सांगत नाही. इतकेच नाही तर तुम्हाला कोणत्याही भांडणामध्ये भाग घेणे मुळीच आवडत नाही. तुमच्याकडे कोणी माफी मागितल्यास त्याला तुम्ही सहज मग करता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने