स्कूटर, कार किंवा कोणतेही वाहन चालवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला पेट्रोलची आवश्यकता पडते. पेट्रोलशिवाय कोणतेही वाहन चालवणे शक्य नाही. जसे कि आपल्या सर्वांना माहिती आहे कि सध्या पेट्रोल आणि डीझेलचे दर गगनाला भिडले आहेत आणि आपण अतिशय विचारपूर्वक गाडीमध्ये पेट्रोल टाकतो.

जे १५ दिवसांचे पेट्रोल गाडीमध्ये टाकून घेतात, त्यांना हे देखील माहिती नसते कि जे पैसे आपण पेट्रोलसाठी देत असते तितके पेट्रोल आपल्याला मिळत आहे का नाही. जर तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत कि पेट्रोल चोरी कशी होते.

समजा तुम्ही ५०० रुपयेचे पेट्रोल गाडीमध्ये टाकत असाल, ५०० रुपयेचे पेट्रोल टाकण्यासाठी एक ते सव्वा मिनिट वेळ लागतो. जेव्हा पेट्रोल पंपवाले तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतात तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष रीडिंगवर असते आणि संधी पाहून कर्मचारी ५ ते १० सेकंदसाठी हँडलसाठी देतात आणि तुम्हाला लक्षात देखील येत नाही कि तुम्हाला ५० ते १०० रुपयांचा तोटा झाला आहे.

पेट्रोलचे डिजिटल मीटर लावले गेले आहेत तेव्हा कधी तुम्हाला पेट्रोल टाकताना मीटरची गती वेगाने होत असलेली पाहायला मिळत असेल. तेव्हा समजून जा कि मीटरमध्ये काहीतरी गडबड आहे आणि तुम्ही याची तक्रार देखील करू शकता.

पेट्रोल टाकण्यासाठी जात असाल तर नेहमी हे लक्षात ठेवा कि पेट्रोल टाकताना आपण नेहमी कारच्या टाकीजवळ राहावे, जर तुम्ही कारच्या आतमध्ये बसून पेट्रोल टाकत असाल तर तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. कारण संधी पाहून पेट्रोल कर्मचारी तुमच्या कारमध्ये कमी पेट्रोल टाकतात आणि तुम्हाला याची जरादेखील माहिती होत नाही.

जर टाकीमध्ये पेट्रोल अर्ध्यापेक्षा खाली राहत असेल तर त्यामध्ये हवा भरते. हवेमुळे तेलाचे प्रमाण कमी होते. पेट्रोल टाकताना मीटर झिरोवर सेट आहे का ते पाहावे आणि नोजलकडे देखील लक्ष असावे. जर तुम्ही ५००, १००, किंवा २०० चे तेल टाकत असाल तर तुम्ही ४९९, ९७ किंवा २९८ अशाप्रकारे पेट्रोल टाकावे कारण पेट्रोल पंपवाले आपल्या पेट्रोलच्या मीटरला अशाप्रकारे सेट करून ठेवतात कि तुम्हाला माहिती देखील होत नाही कि तुम्हाला फसवले गेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने