अनेक लोक असे असतात ज्यांच्या पोटामध्ये कोणतीही गोष्ट टिकून राहत नाही. ते आपल्या घरामधील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगत असतात. तथापि असे करणे आपल्यासाठीच हानिकारक सिद्ध होऊ शकते. आपल्या धर्मामध्ये देखील अशा ७ गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्या दुसऱ्यांसोबत कधीच शेयर करू नयेत. स्त्री असो किंवा पुरुष या दोघांनी स्वतःसंबंधी कोणतीहि गोष्ट कधीच इतरांसोबत शेयर करू नये.

१. गुरुमंत्र: आपला गुरु जो कोणता मंत्र आपल्या देतो तो नेहमीच गुप्त ठेवला पाहिजे. असे केले तरच आपल्याला शुभ फळ प्राप्ती होते. जर इतरांसोबत हा गुरुमंत्र शेयर केल्यास त्याचे फळ तर मिळत नाहीच शिवाय आपले नुकसान देखील होते आणि त्याचा फायदा दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो.

२. अपमान: जर तुमच्यासोबत एखादी अपमानजनक घटना घडली तर ती गुप्त ठेवण्यामध्ये आपली भलाई आहे. जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला त्याबद्दल माहिती होते तेव्हा तो देखील तुमची चेष्टा करू लागतो. महत्वाचे म्हणजे तो त्याला तुमच्या कमजोरीच्या रुपामध्ये देखील वापरू शकतो.

३. र-ति-क्रि-या: जेव्हा पुरुष आणि स्त्री एकमेकांसोबत र-ति-क्रि-या किंवा संबंध बनवतात तेव्हा यासंबंधी गोष्टी गुप्तच ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही दुसऱ्यांसोबत या गोष्टी शेयर केल्या तर तुमच्या चरित्र आणि सामाजिक जीवनासाठी हे खूपच घातक सिद्ध होऊ शकते.

४. पद-प्रतिष्ठा: जर तुम्हाला एखादे मोठे पद किंवा प्रतिष्ठा मिळाली असेल तर त्याला गुप्त ठेवले पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्यांना याबद्दल सांगितले तर यामुळे तुमच्या मनामध्ये अहंकार भाव उत्पन्न होऊ शकतो. हा अहंकार आपल्या पतनाचे कारण देखील बनू शकतो. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचू शकते.

५. धन हानी: जर तुम्हाला पैशांचे नुकसान झाले तर हि गोष्ट कोणालाही सांगू नये. यामुळे लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतील. तुम्हाला धन हानी झाली आहे आणि तुम्ही त्यांना पैसे मागू शकता हा विचार करून लोक तुमच्यासोबतचे चांगले नाते तोडू शकतात. याउलट धन आल्यानंतर देखील हि गोष्ट गुप्तच ठेवली पाहिजे.

६. कौटुंबिक भांडणे: कुटुंबामध्ये होणारे भांडण-तंटे नेहमी गुप्तच ठेवले पाहिजेत. याला जर समाजामध्ये उघड केले तर तुमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचू शकते. तुमच्या कुटुंबासाठी वाईट विचार करणारे लोक या भांडणाचा फायदा देखील घेऊ शकतात.

७. दान: जेव्हा देखील आपण दानधर्म करतो तेव्हा ते देखील गुप्त ठेवले पाहिजे. असे म्हंटले जाते कि गुप्त दान करणाऱ्यांना अक्षय पुण्यासोबत देवी-देवतांची कृपा दृष्टी प्राप्त होते. आपल्या जीवनामध्ये सुख-सुविधांची वृद्धी होते. दुसऱ्यांना सांगून केलेल्या दानाचे पुण्य मिळत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने