सध्याच्या काळामध्ये निरोगी आणि चमकदार केस प्रत्येकाला हवे असतात. यासाठी कदाचित आपल्याला पार्लरमध्ये खूप खर्च करावा लागतो. पण आपल्या घरामध्ये काही अशा वस्तू असतात ज्याद्वारे आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. पण आपण याला दुर्लक्षित करतो. आज आम्ही तुम्हाला केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी एक साधा आणि सरळ घरगुती उपाय सांगणार आहोत.

तांदळामध्ये काही असे पोषक तत्व आढळतात ज्यांच्यामुळे तुम्ही केसांसंबंधी अनेक समस्यांपासून दूर राहू शकता. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तांदळाचे पाणी जुन्या काळापासून वापरले जाते. चला तर जाणून घेऊया याचा वापर कसा करावा.

आवश्यक वस्तू: एक कप पाणी, एक कप तांदूळ. सर्वप्रथम तांदूळ चांगले धुवून घ्यावेत. नंतर तांदूळ एका वाटीमध्ये टाकून तेव्हापर्यंत धुवून घ्या जेव्हापर्यंत त्याचा रंग साफ होत नाही. यानंतर तांदूळ पाण्यामध्ये टाकून शिजवून घ्या. तांदळाचे पाणी एका वाटीमध्ये काढा आणि झाकून ठेवा.

तांदळाचे पाणी १२ ते २४ तास सामान्य तापमानामध्ये ठेवा. असे केल्याने यामध्ये किण्वन (फरमेंटेशन) सुरु होते. पण याला २४ तासापेक्षा जास्त ठेवू नये नाहीतर हे खराब होऊ लागते. हे पाणी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा. तुम्हाला जितक्या पाण्याची आवश्यकता आहे तितकेच पाणी वापरावे आणि बाकी फ्रीज मध्ये ठेवावे.

आता जे तांदळाचे पाणी तुम्ही वाचवून ठेवले आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि यामध्ये २-३ कप एक्स्ट्रा पाणी घाला. याला तीस मिनिट तसेच सोडून ध्या. आता एक स्वच्छ भांड्यामध्ये हे पाणी काढून घ्या. तांदळाचे पाणी जवळजवळ एक आठवडा फ्रीजमध्ये ठेवून देखील वापरामध्ये येऊ शकते.

याचा वापर कसा करावा: तुम्हाला तांदळाच्या पाण्याने केस धुवन्याच्या प्रक्रीयेमध्ये कोणताही बदल करायचा नाही आहे फक्त जेव्हा देखील तांदूळ धुवाल तेव्हा त्याचे पाणी काढून घ्या. नंतर कंडीशनिंग आणि शाम्पू केल्यानंतर या पाण्याचा वापर करावा. हे तुम्ही आठवड्यामधून एकदा किंवा रोज देखील करू शकता.

तांदळाच्या पाण्याचा वापर करतेवेळी हे लक्षात ठेवा कि याचा वापर त्या ठिकाणी जास्त करू नये जिथे तुमचे केस कमी राहिले आहेत. हे पाच मिनिट तसेच लावून ठेवावे नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. तुम्हाला स्वतःला पाहायला मिळेल कि तुमचे केस आधीपेक्षा जाड आणि मजबूत झालेले असतील.

तांदळाच्या पाण्याचे फायदे: किण्वन तांदळाचे पाणी केसांचा पीएच स्तर कमी करते आणि केसांना मजबुती आणि पोषण देते. तुम्ही तांदळाच्या पाण्याला पातळ करून याचा उपयोग कंडीशनर म्हणून देखील करू शकता. याचा उपयोग करून तुम्ही केसांच्या मुळांना मालिश करू शकता. जवळ जवळ ५-१० मिनिटांनी केस स्वच्छ धुवून घ्या. अतिरिक्त पोषण मिळवण्यासाठी तुम्ही यामध्ये लवेंडर, मेंहदी, किंवा जीरियम सारख्या तेलाचा वापर करू शकता.

कुरळ्या केसांसाठी तांदळाचे पाणी खूपच फायदेशीर असते. कारण असे केस कोरडे असतात. तांदळाच्या पाण्यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणात असते जे अशा केसांना सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे केस अधिक सुंदर होतात.

तांदळाच्या पाण्याचा उपयोग सौंदर्य उपचारासोबत केसांसाठी देखील खूप केला जातो. हे सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरळ आणि साधा उपाय आहे. तांदळाच्या पाण्याने केसांना मजबुती मिळते आणि ग्रोथमध्ये देखील सुधार येतो. हे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक सिद्ध झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने