भारत देश फक्त सांस्कृतिक रूपाने सुदृढ नाही तर इथे अनेक परंपरा अशा आहेत ज्या लोकांना चकित करतात. प्रत्येक भारतीय लहानपणापासून अशा अनेक गोष्टी, रिती आणि नियमांचे पण करत आला आहे ज्याबद्दल त्यांना खरे काही माहितीच नाही. आपण काही गोष्टी लहानपणापासून डोळ्यांसमोर होताना पाहत आलो आहोत पण आपल्याला हे माहिती नाही कि शेवटी अशी प्रथा का आहे. हे आपल्याला जास्तकरून धार्मिक कार्यांमध्ये पाहायला मिळते.

भारतामध्ये जितक्या देखील परंपरा प्रचलित आहेत यामागे एक कारण देखील आहे. पौराणिक महत्व देखील प्रथेमध्ये असते. अशीच एक प्रथा आहे नारळाच्या बाबतीत. आपण सर्वांनी पाहिले असेल कि स्त्रिया कधी नारळ फोडत नाहीत. नारळ नेहमी पुरुषच फोडतात. शेवटी यामागे कोणती प्रथा आहे जी महिलांना नारळ फोडण्यापासून रोखते. चला तर याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

नारळ एक फळ नाही तर बी आहे: नारळाला हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्व दिले गेले आहे. पूजेपासून ते उद्घाटनापर्यंत प्रत्येक कार्यक्रमामध्ये नारळ वापरला जातो. त्याचबरोबर नारळाचे आरोग्यदायी फायदेदेखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत.

नारळ एक फळ नाही तर एक बी आहे आणि स्त्रिया एका बी ला जन्म देतात. म्हणजे महीला एका बाळाला जन्म देतात त्यामुळे लोक महिलांना नारळ फोडू देत नाहीत कारण नारळ एक बी आहे आणि महीला कधीच एका बी ला नुकसान पोहोचवू शकत नाहीत.

नारळामागे आहे एक पौराणिक कथा: असे मानले जाते कि नारळ विष्णूदेवाने पृथ्वीवर पाठवलेले एक फळ आहे. या फळावर लक्ष्मीदेवीचा हक्क असतो. यामुळे लक्ष्मीदेवीला सोडून नारळाला इतर महिलांद्वारे फोडू दिले जात नाही. गोष्ट हि देखील आहे कि लक्ष्मी देवी एक स्त्री आहे. नारळावर तिचा अधिकार आहे तर कोणतीही महिला कोणतीही गोष्ट कशी फोडू शकतात जी तिला अर्पण केली जाते.

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते: नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा निवास असतो. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हंटले जाते. तिन्ही देवतांच्या निवासामुळे नारळाला स्त्रियांपासून दूर ठेवले जाते.

नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते: जसे कि आपल्याला माहिती आहे कि पूजेमध्ये नारळाचा वापर केला जातो. जोपर्यंत पूजेमध्ये नारळ वापरला जात नाही तोपर्यंत पूजा अपूर्ण मानली जाते. असे पाहिले गेले आहे कि लोक जेव्हा मंदिरामध्ये दर्शनाला जातात तेव्हा नारळ जरूर घेऊन जातात. यामुळे जेव्हा देखील घरामध्ये पूजा होते तेव्हा नारळ जरूर वापरला जातो. यामुळे घरामध्ये पैशांची कमी कधी होती आणि आणि घरामध्ये वाईट काही घडत नाही.

नारळाचे उत्पादन: जगभरामध्ये ८० पेक्षा जास्त देशामध्ये नारळाचे उत्पादन केले जाते. फिलीपिन्स, इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील मध्ये जगातील नारळाच्या उत्पादनाच्या जवळ जवळ ८०% उत्पादन होते.

नारळाचे आरोग्दायी फायदे: नारळाचा उपयोग आरोग्य लाभ, औषधी उपयोग आणि पोषण तत्वांची कमी पूर्ण करण्यासाठी खाण्यापिण्यामध्ये केला जातो. नारळापासून आपले केस देखील काळे आणि दाट होतात. याशिवाय नारळाच्या प्रयोगाने आपल्या त्वचेमध्ये तजेलदारपणा देखील येतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने