स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या ते इतर लोकांसोबत कधीच शेयर करत नाहीत. इतकेच नाही तर आपल्या आयुष्याभराच्या जोडीदाराला देखील ते सांगत नाहीत. जर स्त्रियांबद्दल बोलायचे झाले तर अशा अनेक गोष्टी असतात ज्यांना कोणत्याना कोणत्या कारणामुळे स्त्रिया आपल्या पतीपासून लपवून ठेवतात.

मग फरक पडत नाही कि तुमचे लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. प्रत्येक महिलेची काही सिक्रेट्स असतात जे ती पतीसोबत कधीच शेयर करत नाही. या पोस्टमध्ये आपण स्त्रियांच्या त्या सिक्रेट्स बद्दल जाणून घेणार आहोत. जे विवाहित महिला आपल्या पतीसोबत शेयर करत नाहीत. चला तर पाहूयात त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत.

प्रत्येक महिलेचा असतो एक सिक्रेट क्रश

प्रत्येक महिलेचे एक सिक्रेट क्रश असते. याबद्दल कोणतीही महिला आपल्या पतीला काहीच सांगत नाही. हि गोष्ट महिला नेहमी आपल्या पतीपासून लपवून ठेवतात. वास्तविक एखाद्यावर क्रश असणे स्वाभाविक असते आणि यामध्ये काहीच वाईट नाही.

पण लग्नानंतर महिला पतीसमोर कधीच आपल्या क्रशबद्दल उल्लेख करत नाहीत. कारण त्यांना भीती असते कि यामुळे त्यांच्या नात्यामध्ये कटुपणा येऊ शकतो. तथापि स्त्रिया आपले हे रहस्य आपल्या खास मैत्रिणीला नक्की सांगतात पण पतीला याबद्दल जरासुद्धा माहिती होऊ देत नाहीत.

आपल्या मनातली गोष्ट

प्रत्येक पती-पत्नीदरम्यान नेहमी कोणत्याना कोणत्या गोष्टीवरून छोटी मोठी भांडणे होत राहतात. वैवाहिक जीवनामध्ये भांडणे होणे सामान्य बाब आहे कारण एखाद्या गोष्टीवरून दोन वेगळ्या व्यक्तींचे विचार वेगळे देखील असू शकतात.

अनेक वेळा असे होते कि पती-पत्नीमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीवरून सहमती बनत नाही तेव्हा मतभेद निर्माण होतात. पण अनेक वेळा एखाद्या मुद्द्यावरून जेव्हा स्त्रियांचे विचार आपल्या पतीसोबत मेळ खात नाहीत तेव्हा हि गोष्ट त्या आपल्या पतीला न सांगता ती त्यांच्यापासून लपवून ठेवतात आणि बाहेरच्या मनाने त्या सहमती दर्शवण्याच्या दिखावा करतात.

पत्नी-पत्नीमधील खास क्षणांचा अनुभव

पत्नी-पत्नीमधील खास क्षणांबद्दल बहुतेक महिला आपल्या पतीसोबत उघडपणे बोलणे पसंत करत नाहीत. त्या नेहमी आपल्या पतीला हे सांगण्यास संकोच करतात कि त्यांना खास क्षणांच्या दरम्यान कसे फील झाले होते. जेव्हा पती आपल्या पत्नीला हे विचारण्याचा प्रयत्न करतो कि तिला खास क्षणांच्या दरम्यान कसे फील झाले होते तेव्हा स्त्रिया अर्धे सत्यच आपल्या पतीला सांगतात आणि मनातील भावना बाहेर येऊ देत नाहीत.

पर्सनल आजाराबद्दल सांगत नाहीत

स्त्रियांचे काही पर्सनल आजार असतात. जेव्हा देखील एखादी महिला एखाद्या आजारामधून जात असते तेव्हा याबद्दल त्या आपल्या पतीला सांगत नाहीत कारण त्यांना वाटते कि जेव्हा आपण आपल्या पतीला त्या आजाराबद्दल सांगतो तेव्हा तो अस्वस्थ होईल आणि काळजी करू लागेल. यामुळे स्त्रिया आपले पर्सनल प्रॉब्लेम्स आपल्या पतीपासून लपवून ठेवतात.

आपल्या खास मित्राबद्दल सांगत नाहीत

प्रत्येक महिलेचा एकतरी खास मित्र मैत्रीण जरूर असते ज्याला तिच्याबद्दल सर्व काही माहिती असते आणि ती महिला आपल्या त्या खास मित्र किंवा मैत्रिणीला आपल्या रिलेशनबद्दल सर्व काही सांगते. पण ती आपल्या पतीला म्हणते कि ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाबरोबरही काहीही शेअर करत नाही.

आपला भूतकाळ सिक्रेट ठेवतात

कोणतीही व्यक्ती आपला भूतकाळ कधीच विसरत नाही. महिला देखील आपल्या भूतकाळाबद्दल नेहमी लक्षात ठेवतात आणि त्या कधीच आपल्या जुन्या रिलेशनबद्दल विसरत नाहीत. पण आपल्या एक्स बद्दल कधीच आपल्या पतीला सांगत नाहीत. आपल्या जुन्या पार्टनरसोबत भूतकाळामध्ये व्यतीत केलेल्या त्या प्रेमळ क्षणांना त्या नेहमी सिक्रेट ठेवतात कारण त्यांना वाटते कि जर आपण याबद्दल आपल्या पतीला सांगितले तर त्याला खूप वाईट वाटेल.

पैसे लपवून ठेवतात

प्रत्येक महिला आपल्या पतीपासून काही पैसे लपवून ठेवतात. घरगुती खर्चामधून जितके पैसे शिल्लक राहतात ते आपल्या पतीला न देता त्या ते लपवून ठेवतात. त्या असे नेहमी करतात. पण त्यांचा हेतू चांगला असतो कारण अचानक पैशांची गरज भासल्यास याच पैशामधून ते आपल्या पतीची आणि कुटुंबाची मदत करतात.

मेक-अपचे सीक्रेट

महिलांचे मेक-अपच्या प्रती आकर्षण कधीच लपून राहिले नाही. प्रत्येक महिलेला मेक-अप खूपच पसंत असतो. पण त्या कधी आपल्या मेक-अपचे सीक्रेट आपल्या पतीला सांगत नाहीत कारण त्यांची इच्छा नसते कि त्यांच्या पतीला हे माहित व्हावे कि स्वतःला सुंदर बनवण्यासाठी त्या कोणकोणत्या वस्तू वापरतात.

तर या होत्या महिलांच्या काही सिक्रेट गोष्टी ज्या त्या आपल्या पतीपासून लपवून ठेवतात. तथापि हे जरुरीचे नाही कि प्रत्येक महिला असे करते पण महिलांच्या मानसिक प्रवृत्तीला पाहून बहुतेक महिलांच्या केसमध्ये या गोष्टी कॉमन मिळतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने