आई बनण्याचा अनुभव खूपच सुखद असतो. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते कि तिने आई व्हावे. जेव्हा महिला प्रेग्नंट होते तेव्हा तिला बरीच सावधानी बाळगावी लागते, आपल्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देण्यासोबतच तिला काही एक्सरसाईज देखील कराव्या लागतात. ज्यामुळे ती आणि तिचे मुल स्वस्थ राहील.

प्रेग्नंसी दरम्यान एक्सरसाईज केल्याने मानसिक समस्यां देखील दूर होतात. जर एखादी स्त्री प्रेग्नंसीदरम्यान सतत योगा, प्राणायाम आणि एक्सरसाईज करत असेल तर तिचे मन संतुलित राहते आणि तिच्या मेंदुमधून पॉजिटिव हार्मोन निघतात जे शरीराला स्वस्थ राखण्यासाठी फायदेशीर असतात.

जर एखादी महिला आई बनत असेल तर तिला आपल्या आरोग्याची आधीपेक्षा विशेष काळजी घ्यावी लागते कारण जर ती स्वस्थ राहिली तर तिचे मुल देखील स्वस्थ राहू शकेल. तिला प्रेग्नंसी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात विटामिन आणि आवश्यक पोषक तत्व घ्यावी लागतील जे तिच्या आणि तिच्या मुलाच्या विकासासाठी मदत करतील.

जर आपण एक्सरसाईज बद्दल बोलायचे झाल्यास प्रेग्नंसी दरम्यान एक्सरसाईज करणे खूप आवश्यक आहे. प्रेग्नंसी दरम्यान एक्सरसाईज केल्याने हॅप्पी हार्मोन रिलीज होतात जे आई आणि मुल दोघांसाठी खूप फायदेशीर असतात. चला तर प्रेग्नंसी दरम्यान कोणकोणत्या एक्सरसाईज कराव्यात ते पाहूयात.

प्रेग्नंसी दरम्यान करा कॅट काऊ

हि एक्सरसाईज करण्यासाठी सर्वात पहिला उलटे गुडघ्यावर आणि हातावर उभे राहावे, नंतर जसे मांजर उभी राहते तसे उभे राहावे. आपली स्पाईन एकदा सरळ करावी आणि एकदा हलके खालच्या बाजूला वाकवावी. त्याचबरोबर श्वास आत घ्यावा आणि सोडावा. काही वेळ हि प्रक्रिया पुन्हा करावी. एक्सरसाईज केल्याने प्रेग्नंट स्त्रीला खूप लाभ मिळतो.

स्पारईनल लेट्रल फ्लेक्शटन

याशिवाय तुम्ही जमिनीवर सरळ उभे राहावे. नंतर दोन्ही हातांना दोन्ही दिशांना सरळ करावे. आता ज्याबाजुला झुकायचे आहे डाव्या किंवा उजव्या त्याबाजूला हात खालच्या बाजूला सरळ करावे आणि दुसरा हात झुकण्यानुसार सरळ ठेवा. अशाप्रकारे दुसऱ्या बाजूला देखील करा आणि थोडा वेळ हि प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी.

सीटेड फॉरवर्ड फोल्डन किंवा पश्चिमोत्तारसन

जमिनीवर पाय सरळ करून बसावे. आपल्या दोन्ही हाताना पायांच्या बाजूने सरळ करावे आणि आपले डोके गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करावा. नंतर सरळ व्हावे असे पुन्हा पुन्हा करावे. असे करतेवेळी दीर्घ श्वास घेत राहावा. तुम्ही हे आसन बसून किंवा उभे राहून देखील करू शकता. पण हे लक्षात ठेवा कि तीन महिन्यानंतर हे आसन करू नये.

हे आसन करताना कमी होतो स्ट्रेस

एक्सरसाईज करणे आपल्या शरीरासाठी खूपच जरुरीचे आहे कारण सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांजवळ वेळ कमी आणि काम जास्त आहे ज्यामुळे त्यांना स्ट्रेस होतो. ते आपल्या कामाबद्दल खूप स्ट्रेस घेतात. लोकांचे मन नेहमी आपल्या ऑफिसच्या कामामध्ये राहते.

जर आपल्याला महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्या देखील पुरुषांप्रमाणे स्ट्रेसमध्ये राहतात. त्या देखील आपल्या कामासाठी नेहमी तत्पर राहतात. पण आपण प्रेग्नंसी काळाबद्दल बोलायचे झाले तर त्यांना आपल्या सोबत आपल्या मुलाची देखील काळजी राहते.

पण जर महिला शांततेने कम करत असतील तर त्यांना प्रेग्नंसीचा काळ सुखद अनुभव देतो कारण त्यांच्या मनामध्ये आपल्या आणि आपल्या मुलाबद्दल उत्सुकता भरलेली असते. त्यांनी जर प्रेग्नंसी दरम्यान हे योगा आणि एक्सरसाईज केले तर त्यांचा स्ट्रेस कमी होईल. जर आई स्वस्थ राहिली तर मुल देखील स्वस्थ राहील. यामुळे प्रेग्नंसी काळामध्ये या एक्सरसाईज जरूर कराव्यात.

टीप:- एक्सरसाईज करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या कि जेणेकरून प्रेग्नंसी काळामध्ये कोणती एक्सरसाईज करणे आपल्यासाठी फायदेशीर राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने