आपण नेहमी पाहिले असेल कि पती-पत्नी दरम्यान वयाचे अंतर असते. कधी-कधी तर यांच्यादरम्यान अनेक वर्षांचे अंतर असते आणि वडीलधारी देखील सांगतात कि पती नेहमी पत्नीपेक्षा वयाने मोठा असावा. पण यामागचे खास कारण कदाचित कोणाला माहिती नसेल. आज आपण जाणून घेणार आहोत कि पत्नी-पत्नीदरम्यान वयाचे अंतर का असावे.

पती-पत्नीदरम्यान महत्वाचे आहे वयाचे अंतर

आधीच्या काळामध्ये वडिलधारे या गोष्टीवर जोर द्यायचे कि लग्न करतेवेळी वर आणि वधूच्या वयामध्ये अंतर असायला हवे. स्थळ शोधताना आज देखील या गोष्टीचा विचार करूनच शोध घेतला जातो आणि मुलापेक्षा मुलीचे वय ५-६ वयाने लहान पाहिले जाते. तसे तर लोकांना हि गोष्ट समजत नाही कि यामागे कोणते मुख्य कारण आहे.

काळानुसार महिलांमध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजमुळे त्या पुरुषांपेक्षा लवकर वयस्कर दिसू लागतात. आपल्या पतीपेक्षा वयाने जास्त वाटू नये यामुळे कुटुंबीय ५-६ वर्षाने लहान मुली शोधतात. असे मानले जाते कि मुली मुलांपेक्षा जास्त मॅच्योर असतात आणि अशामध्ये जर दोघेही वयस्कर असतील तर त्यांचे विचार देखील कधीच जुळणार नाहीत आणि हेच कारण आहे कि सध्याच्या काळामध्ये लग्नानंतर भांडणाची समस्या देखील वाढत आहे.

जर मुलगा मुलीपेक्षा वयाने मोठा असेल तर त्याला घर-गृहस्थीच्या छोट्या-मोठ्या कामांबद्दल तिच्यापेक्षा समज जास्त असेल. तर दुसरीकडे जर दोघेही एकाच वयाचे असतील तर दोघांचा अनुभव समान असेल तेव्हा जीवनामध्ये दोघांनाहि अनेक समस्यांचा सामना करावा लागेल.

पती-पत्नीमधील वयाच्या फरकामुळे होतात हे फायदे

मुलांपेक्षा मुली जास्त भावनिक असतात आणि अशामध्ये आईवडील नेहमी हा प्रयत्न करतात कि त्यांच्या मुलीचा होणारा जोडीदार तिला नेहमी भावनात्मक रूपाने आधार देण्यास सक्षम असावा. अशामध्ये मुलगा आणि मुलीदरम्यान वयाच्या अंतरावर विशेष लक्ष दिले जाते.

या तर्काचा काही रिसर्चमध्ये शोध घेतला आहे आणि हि गोष्ट समोर आली आहे कि जर मुलाचे वय मुलीपेक्षा २-३ वर्षाने मोठे असेल तर त्यांचे वैवाहिक जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत होऊ शकते. त्यांच्या समोर येणाऱ्या समस्या देखील सहजपणे दूर होऊ शकतात.

आजच्या काळामध्ये लक्ष दिले तर मुले-मुली आपल्याच वयाचा जोडीदार निवडतात किंवा कुटुंबियांद्वारे देखील त्यांना असेच लोक पसंद येतात पण त्यांचे हे नाते काही काळ लोटल्यानंतर भांडणामध्ये बदलते आणि त्यांचे नाते तुटण्याच्या दिशेने जाऊ लागते.

तेव्हा हा तर्क एकदम बरोबर आहे कि मुलगा नेहमी मुलीपेक्षा वयाने मोठा असावा आणि अशा जोडीचे वैवाहिक आयुष्य दीर्घकाळ टिकून राहते. जीवनाच्या प्रत्येक सुख-दुखामध्ये ते नेहमी एकमेकांसोबत उभे राहतात आणि प्रत्येक परिस्थितीचा सामना करतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने