सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येकाची इच्छा असते कि त्याची पर्स कधीच रिकामी राहू नये. नेहमी पर्स पैशाने भरलेली असावी. अधिक पैसे कमवण्याच्या प्रयत्नामध्ये व्यक्ती दिवसरात्र मेहनत करतो. आपल्या आरोग्याची काळजी न घेता तो प्रत्येक संभाव प्रयत्न करत असतो.

पण इतके प्रयत्न करून देखील लोकांना पैसे कमवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. महिन्याच्या सुरुवातीला लोकांजवळ पैसे राहतात पण महिन्याच्या शेवटापर्यंत पर्स रिकामी होते आणि पैशांसंबंधित समस्या उत्पन्न होऊ लागतात.

प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ पर्स जरूर ठेवतो आणि पर्समध्ये व्यक्ती पैशांव्यतिरिक्त काहीना काही वस्तू अवश्य ठेवतो. या वस्तू आपल्या जीवनाला प्रभावित करतात. वास्तविक पर्समध्ये ठेवलेल्या काही वस्तू भाग्यशाली असू शकतात. यामुळे आपल्या जीवनामध्ये बरकत बनून राहते.

या वस्तू आपल्यासाठी चांगल्या सिद्ध होतात आणि या वस्तूंचा मोठा फायदा आपल्याला मिळू शकतो. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जर आपल्या पर्समध्ये ठेवल्या तर आपले भाग्य चमकेल आणि पैशाच्या समस्येपासून सुटका प्राप्त होईल. तुमची देखील इच्छा असेल कि आपल्या पर्समध्ये नेहमी पैसे राहावे तर या वस्तू आपल्या पर्समध्ये अवश्य ठेवाव्यात.

या वस्तू ठेवा आपल्या पर्समध्ये

शास्त्रानुअर श्री यंत्रला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. जर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी हवी असेल तर पर्समध्ये छोट्या आकाराचे श्रीयंत्र जरूर ठेवावे. यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्ती होईल. धर्म ग्रंथांमध्ये देखील श्री यंत्राचा महिमा सांगितला गेला आहे. पण तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल कि श्री यंत्र आपल्या पर्समध्ये ठेवण्यापूर्वी याची विधिवत पूजा करावी.

पर्समध्ये धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मीचा एक फोटो अवश्य ठेवावा. यामुळे आपल्या जीवनावर शुभ प्रभाव पडतो. जर पर्समध्ये धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मीचा फोटो ठेवला तर यामुळे बरकत येते आणि पर्सदेखील कधी रिकामी राहत नाही. जर पर्समध्ये ठेवलेला माता लक्ष्मीचा फोटो फाटला तर हा फोटो नदीमध्ये प्रवाहित करून दुसरा नवीन फोटो जरूर ठेवावा.

पिंपळाचे पान पर्समध्ये ठेवणे खूप शुभ मानले गेले आहे. तुम्ही अभिमंत्रित पिंपळाचे पान आपल्या पर्समध्ये ठेवावे. एखादा चांगला मुहूर्त बघून तुम्ही पिंपळाचे पान तोडावे आणि याला गंगाजलाने धुवून पवित्र करावे, आता यावर केसरने श्री लिहून आपल्या पर्समध्ये ठेवावे.

माता लक्ष्मीच्या पूजेदरम्यान जे तांदूळ अर्पित केले जाते हे तांदूळ एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून आपल्या पर्समध्ये ठेवावे. जर तुम्ही असे केले तर यामुळे शुक्र ग्रह आणि धन संपत्तीची देवी लक्ष्मीकडून अनुकूल फळ प्राप्ती होईल.

अनेक लोकांना पाहिले गेले आहे कि ते आपल्या पर्समध्ये गुरुचा लहान फोटो ठेवतात. गुरुचा फोटो पर्समध्ये ठेवल्याने जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये वाईट परिस्थिती उत्पन्न होते तेव्हा यामुळे आपल्याला समाधान मिळते आणि आपले मन शांत राहते. गुरुचा फोटो आपल्या पर्समध्ये ठेवल्याने धनासंबंधी समस्या देखील उत्पन्न होत नाहीत.

तुम्ही तुमच्या पर्समध्ये धन संपत्तीची देवी माता लक्ष्मीसंबंधी वस्तू जसे गोमती चक्र, समुद्री कवडी, कमलगट्टे, चांदीचे नाणे ई. ठेवावे कारण या सर्व वस्तू माता लक्ष्मीला खूप पसंत आहेत. जर आपण या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवली तर यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्ती होते. या वस्तू पर्समध्ये ठेवण्यापूर्वी थोडा वेळ माता लक्ष्मीच्या चरणावर अवश्य ठेवावी आणि त्यानंतर पूर्ण श्रद्धेने आपल्या पर्समध्ये ठेवावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने