पुरुष आणि महिला आपल्या ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण हे प्रोडक्ट्स वापरल्याने ओठांचा काळेपणा दूर होत नाहीच उलट ओठ आधीपेक्षा जास्त काळपट आणि अधिक कुरूप दिसू लागतात.
अशामध्ये ओठांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे फक्त तुमची उललेल्या ओठांचीच समस्या दूर होणार नाही तर तुमचे ओठ अधिक गुलाबी आणि सुंदर दिसू लागतील. चला तर जाणून घेऊया काही टिप्स.
एक चमचा दुध आणि एक चमचा मलईमध्ये थोडे केशर मिसळा. यानंतर यांना मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यानंतर काही वेळ लावावे आणि कापसाने पुसून टाकावे. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी दुधाची मलई सर्वात उत्तम उपाय आहे. दुधाची मलई रात्री झोपताना आपल्या ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी होतील आणि ओठांचा कोरडेपणा देखील दूर होईल.
केळीचा लगदा काही वेळ ओठांवर लावल्याने ओठ मुलायम, आकर्षक आणि गुलाबी बनतील. एक चमचा दुधामध्ये लाल गुलाबाच्या काही पाकळ्या टाकून तेव्हापर्यंत मिक्सरला लावावे जेव्हापर्यंत ते गुलाबी होत नाही. यानंतर हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे.
थंड झाल्यानंतर यामध्ये एक चमचा बदाम पावडर टाकून याची चांगली पेस्ट बनवून घ्या. हि पेस्ट ओठांवर लावून १०-१५ मिनिटांनी कापसाने स्वच्छ करून घ्यावे. या उपायाने ओठ मुलायम, चमकदार आणि गुलाबी होतील.
एक चमचा दुधाच्या मलईमध्ये डाळिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करून ओठांवर लावावे. या उपायाने उललेले ओठ चांगले होतील आणि ओठांचा रंग देखील गुलाबी होईल. रात्री झोपताना मोहरीचे तेल नाभीवर लावल्याने देखील ओठ कधीच उलत नाहीत.
ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हॅसलीन मिसळून दिवसामधून २-३ वेळा लावल्याने चांगला फायदा मिळतो. उललेल्या ओठांसाठी दही आणि बटरमध्ये केशर मिसळून ओठांवर हलक्या हाताने लावावे. ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी थोडी मलई चिमुटभर हळदीमध्ये टाकून हळू हळू ओठावर मालिश करावी. यामुळे ओठ उलणार नाहीत आणि ओठ मुलायम बनतील.
अर्धा चमचा मधामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावल्याने ओठ गुलाबी आणि सुंदर बनतात. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी मधामध्ये लिंबाचा रस मिसळून लाल्याने चांगला फायदा मिळतो.
टिप्पणी पोस्ट करा