बॉलीवूडमध्ये डांसिंग क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली नोरा फतेहीच्या डांसचा प्रत्येकजण चाहता आहे. नोरा फक्त एक डांसरच नाही तर ती एक मॉडेल देखील आहे आणि नोराला लोक तिच्या दिलबर दिलबर या सुपरहिट डांसमुळे दिलबर गर्ल म्हणून देखील ओळखतात. नोरा नेहमी आपल्या बेस्ट डांस मूव्हने चाहत्यांना घायाळ करते आणि तिचे सौंदर्य एखाद्या अप्सरेपेक्षा काही कमी नाही.

नोराने चित्रपटांमध्ये फक्त आयटम सॉंग करूनच इतकी लोकप्रियता मिळवली आहे जी अनेक वर्षे अभिनय करून देखील मिळवता येत नाही. आजच्या काळामध्ये नोरा फतेहीला नंबर वन डांसर म्हणून ओळखले जाते. आज आपण नोराच्या जीवनासंबंधी काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती असेल.

आज नोरा ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप स्ट्रगल केले आहे. जसे आपल्याला माहितीच आहे कि नोरा कॅनेडियन असून तिचा जन्म कॅनडाच्या क्यूबेक सिटीमध्ये झाला होता. नोराने जेव्हा आपले शिक्षण पूर्ण केले होते तेव्हा तिने जॉबच्या शोधामध्ये अनेक छोटी मोठी कामे देखील केली होती. नोराने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि आपल्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये तिने एका शॉपिंग मॉलमध्ये स्टोर देखभालीचे काम देखील केले होते.

इतकेच नाही तर तिने हे देखील सांगितले कि एका कॉफी शॉपमध्ये तिने वेट्रेसचे देखील काम केले होते. तिने सांगितले कि या जॉबमधून तिला चांगली कमाई होत होती आणि नंतर यादरम्यान नोराला भारतामधून एका अॅड फिल्मची ऑफर मिळाली आणि ती भारतात आली. ज्यानंतर नोराचे दिवस बदलण्यास वेळ लागला नाही आणि ती एक प्रसिध्द स्टार बनली. नोरा सांगते कि जेव्हा ती पहिल्यांदा कॅनडाहून भारतात आली तेव्हा तिच्याजवळ ५००० रुपये होते.

भारतामध्ये आल्यानंतर नोराने खूप स्ट्रगल केले, हिंदी बोलणे शिकून घेतले, अनेक शोज होस्ट केले, जाहिराती केल्या आणि नंतर तिला नशिबाने दिलबर सॉंगवर डांस करण्याची संधी मिळाली. तिचे नशीब उजळळे आणि नंतर नोराने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि ती पुढे जात राहिली. नोरा फतेही बिग बॉस सीजन ९ मध्ये दिसली होती आणि झलक दिखला जा रियालिटी शोमध्ये नोराने आपले टॅलेंट दाखवले होते.

नोरा फतेहीचे अंगद बेदीसोबतचे अफेयर खूपच चर्चेमध्ये राहिले होते. पण अंगद बेदीने नोराला धोका दिला आणि बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियासोबत लग्न केले. ज्यानंतर नोराला खूप मोठा धक्का बसला होता. पण ती या सर्व गोष्टी विसरून पुढे गेली आणि आज नोरा फतेहीने बॉलीवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नोरा फतेहीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि सोशल मिडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने