२०२० हे वर्ष समाप्तीच्या दिशेने पुढे जात आहे आणि २०२१ वर्षाचे लवकरच आगमन होणार आहे. प्रत्येकजण येणाऱ्या नवीन वर्षाबद्दल बऱ्याच अपेक्षा ठेवतात, पण २०२० हे वर्ष म्हणावे तितके चांगले गेले नाही. २०२० मध्ये आलेल्या को-रो-ना वि-षा-णूने प्रत्येकाला त्रस्त केले आहे. अशामध्ये प्रत्येकाची हीच इच्छा असेल कि येणारे नवीन वर्ष सुख-समृद्धी देणारे असावे.

तुम्ही हि इच्छा देखील पूर्ण होईल कि येणारे वर्ष तुमच्यासाठी चांगले सिद्ध व्हावे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. तसे फेंगशुई आणि वास्तूशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहे जे तुमचे येणारे नवीन वर्ष आनंदाने भरू शकतात. आज आपण असेच काही उपाय जाणून घेणार आहोत जे आपल्यासाठी खूपच कामी येणार आहेत.

पिरॅमिडः येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुम्ही पितळ, तांबे, काच, दगड, लाकूड या पाच धातूंपैकी एका धातूचे बनलेले पिरॅमिड आपल्या घरामध्ये स्थापित करावे. यामुळे आपल्या घरामध्ये असलेले कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष दूर होतील आणि सकारात्मकतामध्ये वाढ होईल.

विंड चाइम: आपल्या घराच्या दरवाजा किंवा अशा स्थानी जिथे हवा घरामध्ये प्रवेश करते त्या ठिकाणी विंड चाइम लावावा. जेव्हा हवेमुळे विंड चाइमचा आवाज घरामध्ये घुमू लागेल तेव्हा आपल्या मनामध्ये एक सुखद अनुभव निर्माण होईल.

क्रिस्टल बॉल्स: फेंगशुईमध्ये क्रिस्टल बॉल्सला आर्थिक समृद्धीचे प्रतिक मानले गेले आहे. असे सांगितले गेले आहे कि क्रिस्टल बॉल्स आपल्या आसपास असलेल्या नकारात्मकतेला आपल्यामध्ये समाविष्ट करते आणि वातावरणामध्ये सकारात्मकता पसरवते.

लाफिंग बुद्धा: लाफिंग बुद्धा तर आपल्या सर्वांना माहितीच असेल. फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाला खूपच शुभ मानले गेले आहे. असे सांगितले गेले आहे कि लाफिंग बुद्धा जिथे देखील असतो तिथे सुख समृद्धी नक्कीच येते.

धातूचा कासव: धातूचा कासव तुम्ही नक्की पाहिला असेल. आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी धातूचा कासव आपल्या घरामध्ये आणून नक्की ठेवावा. फेंगशुईनुसार धातूचा कासव घरामध्ये ठेवल्याने धनाच्या आगमनामध्ये वृद्धी होते.

तीन पाय असलेला बेडूक: फेंगशुईमध्ये तीन पाय असलेल्या बेडकाला भाग्याचे प्रतिक मानले गेले आहे. तीन पाय असलेला बेडूक आपल्या तोंडामध्ये नाणे घेतलेला असतो, तुम्ही याला आपल्या घरच्या मुख्य द्वाराजवळ कुठेही स्थापित करावे.

बांबूची रोपे: फेंगशुईमध्ये बांबूच्या रोपाला खूपच महत्व आहे. चीनी वास्तूशास्त्र म्हणजे फेंगशुईमध्ये याला सुख समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतिक मानले गेले आहे. शुभ फळ प्राप्ती साठी याला आपल्या खोलीच्या पूर्वेकडील भागामध्ये स्थापित करावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने