प्रत्येकाला आपल्याबद्दल काहीतरी नवीन जाणून घ्यायची उत्सुकता असते. पण समस्या हि येते कि प्रत्येकाबद्दल तर सर्व काही सांगितले जाऊ शकत नाही. असे असून देखील असे अनेक स्रोत आहेत जिथे महिला आणि पुरुषांसाठी खूप काही सांगितले गेले आहे. मग गोष्ट अंक शास्त्राची असो किंवा ज्योतिषशास्त्राची असतो किंवा समुदशास्त्र किंवा वास्तू शास्त्र.

असो आज आपण जाणून घेणार आहोत समुद्र शास्त्राबद्दल. सामुद्रिक शास्त्र, मुख मंडल तथा संपूर्ण शरीराच्या अभ्यासाची विद्या आहे. यामध्ये बरीच माहिती देण्यात आली आहे. याशिवाय शरीराच्या विविध भागाच्या आधारावर व्यक्तीच्या विशेष स्वभावाबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

चला तर जाणून घेऊया तुमच्या नाभी नुसार कसा आहे तुमचा स्वभाव

गोल नाभी: गोल नाभी असलेले लोक बऱ्याचदा प्रेमात असतात. अशा लोकांना आरोग्याबाबतीत विशेष सावधानी बाळगली पाहिजे. गोल नाभी असलेल्या स्त्रिया सुंदर आणि बुद्धिमान असतात. त्यांचे कौटुंबिक जीवन खूपच सुखमय असते.

मोठी आणि खोल नाभी: मोठी आणि खोल नाभी हि चांगल्या नशिबाचे संकेत आहेत. हे लोक बुद्धिमान आणि उदार असतात. हे लोक कोणतीही परिस्थती सहजतेने हाताळतात. सुरुवातीच्या जीवनामध्ये हे लोक भलेहि असफल राहिले असतील पण एका वयानंतर हे सफल होतात. मोठी आणि खोल नाभी असलेल्या स्त्रियांचा स्वभाव सरळ आणि भावूक असतो.

उथळ नाभी: उथळ आणि छोटी नाभी कमजोरी आणि नकारात्मकतेचे संकेत आहे. यांची कामे कधीच लवकर पूर्ण होऊ शकत नाहीत. उथळ आणि छोटी नाभी असलेल्या स्त्रिया चिडचिड्या स्वभावाच्या असतात. तर पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर ज्या पुरुषांची नाभी उथळ आणि छोटी असते ते बुद्धिमान, स्पष्टवादी असतात. त्याचबरोबर त्या सौभाग्यशाली असतात. नाती मनापासून निभवतात.

वर आलेली मोठी नाभी: ज्यांची नाभी वरच्या दिशेने, खोल आणि मोठी असते अशी नाभी चांगली समजली जाते. असे लोक हसमुख एनर्जेटिक स्वभावाचे असतात. तर अशी नाभी असलेल्या स्त्रिया मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. तर पुरुष आयुष्यभर संघर्ष करत राहतात. पुरुषांना धन कमावण्याच्या संधी मिळतात पण यांची अंतरआत्मा काहीही चुकीचे करू देत नाही.

खालच्या दिशेने असलेली नाभी: ज्यांची नाभी खालच्या दिशेने असते त्या लोकांमध्ये जास्त एनर्जी नसते. हे लोक आपली कामे अपूर्णच सोडून देतात. अशा पुरुषांना पहिली मुलगी झाल्यानंतर त्यांचे जीवन सौभाग्यशाली बनते.

अंडाकृती नाभी: ज्या लोकांची नाभी अंडाकृती आकाराची असते असे लोक जास्त विचार करणारे असतात. असे लोक कोणतेही काम विचारपूर्वक करतात. त्यामुळे ते चांगल्या चांगल्या संधी सोडून देतात. अशा लोकांनी जास्त विचार करू नये.

गोलाकार किंवा गोल नाभी: गोलाकार किंवा गोल नाभी असलेले लोक आशावादी असतात. असे लोक नेहमी पॉजिटिव विचारसरणी ठेऊन कोणतेही काम करतात. असे लोक मनाने थोडे कमी मजबूत असतात. मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत यांचे चांगले संबंध असतात. यांच्याजवळ पैशांची कधीच कमी नसते.

आकार नाभी: ज्या लोकांची नाभी वरून खालीपर्यंत येताना दोन भागांमध्ये विभागली जाते असे लोक आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्याच्या बाबती खूपच चांगले असतात. अशा लोकांमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने