हुं’ड्या’ची मागणी पूर्ण करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींची चांगल्या प्रकारे खातीरदारी व्यवस्थित झाली नाही तर लग्न मोडण्याची बातमी तर आपण ऐकलीच असेल. पण नुकतेच प्रतापगढच्या कुंडा भागामध्ये एका अनोख्या लग्न सोहळ्याने माणुसकी आणि प्रेमाची एक वेगळी परिभाषा मांडली आहे. ज्याचे सध्या सर्वच स्तरामधून कौतुक होत आहे.

१५ वर्षापूर्ण प्रदर्शित झालेला शाहीद कपूर आणि अमृता रावच्या विवाह चित्रपटाप्रमाणे इथे देखील लग्नाच्या अवघ्या काही तासाअगोदर एका अ’प’घा’ता’मध्ये वधू पूर्णपणे अ’पं’ग झाल्यानंतर देखील नवऱ्या मुलाने तिच्यासोबत लग्न करून आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन दिले. इतकेच नाही तर विवाहासाठी जी तारीख निश्चित केली गेली होती त्या दिवशी पत्नीला रुग्णवाहिकाने घरून आणून स्ट्रेचरवर तिच्यासोबत लग्न केले. खऱ्या आयुष्यावर आधारित या लग्नाबद्दल सध्या सर्वच स्तरामधून कौतुक होत आहे.

कसा झाला अपघात

कुंडा भागात राहणाऱ्या आरती मौर्यचे लग्न जवळच्याच गावामध्ये राहणाऱ्या अवधेशसोबत निश्चित झाले होते. कुटुंबामध्ये खूपच आनंदाचे वातावरण होते आणि लग्नाची तयारी जोरदार सुरु होती. नाचणे गाणे सुरु होते. नातेवाईकांचे आगमन सुरु झाले होते. सर्व काही व्यवस्थित सुरु होते. ८ डिसेंबर रोजी नवऱ्या मुलाचे धुमधडाक्यात आगमन होणार होते. लग्नाचा दिवस देखील आला. कुटुंबातील सदस्य आतिथ्य करण्यामध्ये व्यस्त होते.

तेव्हा एक अ’प’घा’त झाला ज्यामुळे घरामधील आनंदाचे वातावरण शोकाकुल वातावरणामध्ये बदलले. दुपारी एक वाजता एका मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वधू आरतीचा पाय घसरला आणि ती छतावरून खाली पडली. या अ’प’घा’तामध्ये आरतीच्या पाठीचा मनका मोडला. कमरेवर आणि पायाव्यतिरिक्त शरीराच्या इतर दुसऱ्या भागांना देखील दुखापत झाली. वाईट गोष्ट हि होती कि जवळच्या रुग्णालयांनी आरतीच्या उपचारासाठी असमर्थता दर्शवली. यामुळे तिला इलाजासाठी प्रयागराज येथे नेण्यात आले. अपघातानंतर कुटुंबियांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले होते.

एक्स रे काढल्यानंतर हे समोर आले कि तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे आणि पाठीचा मनका देखील तुटला आहे. याची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली गेली. बातमी मिळताच नवरा मुलगा अवधेश आणि इतर सदस्य आरतीला पाहण्यासाठी रूग्णालयामध्ये पोहोचले. खास गोष्ट हि होती कि वधूकडच्या लोकांनी अवधेशला सांगितले कि आरतीच्या ठिकाणी तिच्या बहिणीसोबत लग्न करावे पण अवधेशने स्पष्ट नकार दिला आणि तिच्यासोबतच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अवधेशचा हा निर्णय ऐकून सर्वजण चकित झाले. तर मुलीकडच्या सदस्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहू लागले. रूग्णालयातील डॉक्टरांना जेव्हा आरतीच्या लग्नाबद्दल सांगण्यात आले तेव्हा त्यांनी तिला स्ट्रेचरवर नेण्यास परवानगी दिली. ज्यानंतर अवधेश आणि आरतीचे लग्न झाले. स्ट्रेचरवरच आरतीने सात फेरे घेतले. ऑक्सीजन आणि ड्री’प लावलेल्या अवस्थेत तिच्या माथ्यावर सिंदूर लावले गेले. इतर वधूंप्रमाणे आरतीला देखील निरोप देण्यात आला. हि एक वेगळी बाब होती कि सासरी जाण्याऐवजी तिला रूग्णालयामध्ये पुन्हा परत नेण्यात आले.

दुसऱ्या दिवशी ऑ’प’रे’श’नच्या फॉर्मवर स्वतः अवधेशने पती म्हणून सही केली. सध्या आरतीचा रूग्णालयामध्ये इलाज सुरु आहे. मुलीच्या सासरच्यांचे म्हणणे आहे कि आरतीच्या इलाजासाठी जो काही खर्च येईल तो सर्व खर्च ते करतील. तर आरतीच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे कि आरती पूर्णपणे बरी झाली कि सर्व विधी ते धूमधडाक्यामध्ये पार पाडतील. तसे एक गोष्ट ती कोणीतरी योग्य सांगितली आहे कि जोडी वरचा बनवतो आणि त्या नात्याला टिकवण्याचे धैर्य देखील तोच देतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने