कार्तिक महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला देखील श्रीकृष्णाच्या पूजेचा महिना म्हंटले गेले आहे. उलट या महिन्याला श्रीकृष्णाचे स्वरूपच म्हंटले गेले आहे. हेच कारण आहे कि या महिन्यामध्ये एक वेगळ्याप्रकारची चमत्कारी शक्ती असते. या दरम्यान जर एखाद्या व्यक्तीने पूजा केली तर त्याच्या समस्त मनोकामना पूर्ण होतात.

इतकेच नाही तर हि देखील प्रचलित मान्यता आहे कि जो देखील व्यक्ती या महिन्यामध्ये श्रद्धापूर्वक ध्यान आणि उपासना करतो त्याला अमोघ फळाची प्राप्ती होते. धार्मिक शास्त्रामध्ये अमोघचा अर्थ कधीच नष्ट न होणारा असा होतो. यामुळे ज्योतिष सल्ला देतात कि या महिन्यामध्ये श्रीकृष्णाची पूजा जरूर करावी.

पण याशिवाय लोकांनी यामहिन्यामध्ये हि देखील कामे करावीत

बहुतेक लोक मंदिरामध्ये किंवा घरच्या पूजास्थळी बसून पूजा करतात, पण असे म्हंटले जाते कि या महिन्यामध्ये व्यक्तीला श्रीकृष्णाची पूजा पवित्र नदी किंवा सरोवर ई. ठिकाणी जावून केली पाहिजे. जी व्यक्ती संतानाची कामना करते त्यांनी या महिन्यामध्ये श्रीकृष्णाची उपासना जरून करायला हवी.

या दरम्यान कीर्तन, शास्त्राचे पठण केल्याने अमोघ फळाची प्राप्ती होते. तर या महिन्यामध्ये केली गेलेली प्रत्येक मांगलिक कामे देखील सफल होतात. जो व्यक्ती अंतर्मनाने या महिन्यामध्ये श्रीकृष्णाची आराधना करतो त्याला चंद्राकडून अमृत तत्वाची प्राप्ती होते.

या महिन्यामध्ये श्रीकृष्ण मंत्र, आरती, चालीसा, श्लोक, स्तुती ई. चे पठन विशेष फलदायी असते. गौसेवा करणे देखील या महिन्यामध्ये खूपच लाभदायक मानले गेले आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणे देखील लाभदायक असते. याशिवाय श्रीकृष्णाची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी फक्त प्रेम साधनच पर्याप्त असते.

या महिन्यामध्ये जर पूर्ण प्रेम भावनेने श्रीकृष्णाची आराधना केल्यास निश्चित रूपाने याचे उचित फळ मिळते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिदिन गीता पठन अवश्य करावे. याशिवाय या महिन्यामध्ये तेल मालिश करणे शुभ फळ प्रदान करते. तर काही वस्तूंचा वापर करण्यास मनाई केली गेली आहे जसे जिरे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने