भारतीय संस्कृतीमध्ये साधू संतांचा खूपच आदर सन्मान केला जातो आणि आपल्यासाठी त्यांचा हा त्याग अनुकरणीय आहे. आपण त्यांचा हा त्याग, तपस्या आणि आकर्षण योग साधना कुंभच्या मेळ्याआमध्ये पाहू शकतो. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे साधू संत आहेत. आज आपण महिला नागा साधूंची काही चकित करणारी माहिती जाणून घेणार आहोत.

तसे तर आपण सर्व नागा साधूंच्याबद्दल जाणतोच, पण आपण इथे काही रंजक माहिती जाणून घेणार आहोत. जी तुम्ही याआधी कधी ऐकली किंवा वाचली नसेल. प्रत्येकाला माहिती आहेच कि पुरुषच नागा साधू बनतात पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि महिला देखील नागा साधू बनतात. आपण इथे महिला नागा साधू बनण्याचे काही नियम जाणून घेणार आहोत, कशाप्रकारे एक महिला नागा साधू बनते.

महिला नागा साधू बनण्यासाठी सर्वात प्रथम महिलेचे मुंडन केले जाते. याशिवाय अन्य साधू संत महिला संत या गोष्टीची पुष्टी करतात कि तिचा आपल्या कुटुंबाप्रती मोह, सुख संपुष्टात आला आहे. नागा साधू बनण्यासाठी महिलेला सर्व नाती आणि नातेवाईकांचा त्याग करावा लागतो आणि संसारिक सुखांना देखील स्वतःपासून दूर करावे लागते. जेव्हा ती आपल्या कुटुंबापासून दूर होते आणि तिला कोणत्याही गोष्टीचा मोह राहत नाही तेव्हा ती नागा साधू बनू शकते.

कुंभ मध्ये पुरुष नागा साधूंसोबत महिला नागा साधू देखील शाही स्नान करू शकतात. महिलेला नागा साधू बनल्यानंतर पुरुष नागा साधू सारखे राहावे लागत नाही. महिला नागा साधू न-ग्न राहत नाहीत त्यांना कपड्यांची सूट राहते म्हणजे त्या कपडे घालू शकतात. जर त्यांची इच्छा असेल तर त्या देखील न-ग्न राहू शकतात. महिला नागा साधूंच्या त्यागाचे जगभरामध्ये कौतुक केले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने