बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने नुकतेच एका मुलाखतीमध्ये असा खुलासा केला आहे ज्यामुळे ती सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. वास्तविक कियाराला जेव्हा विचारले गेले कि अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्यांना ती से*पेक्षा जास्त चांगल्या मानते. यादरम्यान कियाराने आपल्या एका किस्स्याबद्दल देखील सांगितले जेव्हा ती मरता-मरता वाचली होती. वास्तविक एका न्यूज वेबसाईटने तिचा या मुलाखतीचा व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये कियाराला अनेक रंजक प्रश्न विचारले गेले.

कियाराचे उत्तर

कियारा आडवाणीला जेव्हा विचारले गेले कि तिला से*पेक्षा काय चांगले वाटते तेव्हा ती उत्तर देताना म्हणाली कि पिज्जा, शॉपिंग आणि एक उत्कृष्ठ चित्रपट. कियाराला या दरम्यान हे देखील विचारले गेले कि तिला एखादा कीटक किंवा किडा बनण्याची संधी मिळाली तर तिला काय बनायला आवडेल. कियारा यावर उत्तर देताना म्हणाली कि तिला कॅटरपिलर बनायला आवडेल जेणेकरून नंतर ती फुलपाखरू बनू शकेल.

मरता-मरता वाचली होती

कियारा आडवाणीने या दरम्यान हे देखील सांगितले कि जेव्हा ती कॉलेजमध्ये शिकत होती तेव्हा आपल्या क्लासमेट्स सोबत एका ट्रीपवर गेली होती. ट्रीप दरम्यान तिच्या रूमला आग लागली होती. आग इतकी भयानक होती कि तिला त्यादिवशी वाटले होते कि तीचा आता जीव जाणार आहे.

पहिले रिलेशनशिप

एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री कियाराने म्हंटले होते कि ती जेव्हा १० वी मध्ये शिकत होती तेव्हा ती पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये आली होती, तेव्हा आईने फोन वर बोलताना तिला पकडले होते. त्यांनी म्हंटले होते कि तुझे बोर्ड एक्झाम जवळ आले आहेत. तू आपले सर्व लक्ष आपल्या अभ्यासावर दे.

कियाराने त्यादरम्यान हे देखील म्हंटले होते कि माझ्या आई-वडिलांचे लव्ह मॅरेज झाले होते. दोघे एकमेकांचे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड होते, तेव्हा आम्ही आमच्या घरामध्ये खूप प्रेमळ वातावरण पाहिले आहे. मी ज्याला डेट करत होते तेव्हा विचार करत होते कि त्याच्यासोबतच लग्न करावे.

तेव्हा मी प्रेम आणि लग्नावर विश्वास करत होते. अभिनेत्रीला जेव्हा विचारण्यात आले कि रिलेशनशिपमध्ये तू काय सहन करू शकत नव्हती, त्यावर तिने म्हंटले कि मी कोणत्याची प्रकारचा दुर्व्यवहार सहन करू शकत नव्हते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने