लहान मुले खूपच क्युट असतात हे तर सर्वांना माहिती आहे अशामध्ये अनेक वेळा आई-वडील त्यांच्या लहान लहान चुकांकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही अनेक वेळा पाहिजे असेल कि काही मुलांना नखं खाण्याची सवय असते. सुरुवातीला आईवडील मुलांच्या या सवयीकडे लक्ष देत नाहीत पण नंतर मुलांची हि सवय मोठी समस्या होऊन बसते. अनेक वेळा समजावून देखील मुले हि सवय सोडू शकत नाहीत.

नखं खाताना इतरांना ते खूपच घाणेरडे वाटते. त्याचबरोबर हि सवय मुलांच्या आरोग्यासाठी देखील खूप हानिकारक असते. कारण नखं खाल्ल्याने त्यांच्या पोटामध्ये घाण जाते आणि ते आजारी पडतात. जर तुम्ही देखील आपल्या मुलांच्या नखं खाण्याच्या सवयीमुळे चिंतित असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही आपल्या मुलांची हि वाईट सवय सहजपणे सोडवू शकता.

कडू वस्तूंचा प्रयोग

जर तुमच्या मुलाला नखं खाण्याची सवय असेल तर तुम्ही त्यांच्या नखांवर एखादी कडू वस्तू लावू शकता जसे कडुलिंबाच्या पानांचा रस. कारण तुम्हाला माहिती आहे कि कडुलिंबाची पाने खूपच कडू असतात. अशामध्ये जेव्हा आपण याचा रस तुमच्या मुलांच्या नखांवर लावाल तेव्हा जेव्हा कधी ते आपल्या नखांना तोंडामध्ये घालतील तेव्हा त्यांना कडूपणा लागेल.

याशिवाय तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा रसाशिवाय मिरची पाउडरचा देखील वापर करू शकता. हे सामन्यत: वापरले जाणारे सर्व सोपे उपाय आहेत. असे नेहमी केल्यास काही दिवसांमध्ये मुले नखं खाण्याची सवय सोडून देखील.

नेल पॉलिश रिमूवर देखील चांगला विकल्प

नखं खाण्याची सवय मोडण्यासाठी तुम्ही नेल पॉलिश रिमूवरचा देखील वापर करू शकता. हा एक चांगला विकल्प आहे. मुलांच्या नखांवर नेल पॉलिश रिमूवर लावा, यामुळे हे होईल कि जेव्हा देखील मुले आपली नखे खाण्याचा प्रयत्न करतील तेव्हा नेल पॉलिश रिमूवरच्या खराब स्वादामुळे ते असे करू शकणार नाहीत आणि लवकरच त्यांची हि सवय मोडून जाईल.

खराब स्वाद असणारी नेलपॉलिश लावून सोडवू शकता हि सवय

जर तुमच्या घरामध्ये नेलपॉलिश रिमूवर नसेल तर त्याच्या जागी तुम्ही खराब स्वाद असणारी नेलपॉलिश देखील वापरू शकता. जर मुले जास्त नखे खात असतील तर त्यांच्या नखांवर अशी नेलपॉलिश लावा ज्याचा स्वाद खूपच खराब असेल. कारण हे तर स्पष्ट आहे कि मुले जितक्या वेळा नखे खाण्यासाठी आपले बोटे तोंडामध्ये घालतील तेव्हा नेलपॉलिशच्या खराब स्वादामुळे त्यांच्या तोंडाची टेस्ट देखील खराब होईल आणि काही दिवसांमध्ये ते असे करणे सोडून देतील.

मुलांच्या नखांची नेहमी काळजी घ्या

मुले लहान असतात त्यामुळे ते स्वतःची नखे कापू शकत नाहीत यामुळे हि आपली जबाबदारी आहे कि त्यांची नखे जास्त वाढू देऊ नयेत कारण नखे वाढल्यानंतर मुले त्याला चघळायला सुरुवात करतात. अशामध्ये जर तुम्ही वेळोवेळी त्यांची नखे कापली तर त्यांची हि सवय अपोआपच सुटून जाईल. याशिवाय वाढलेल्या नखांमध्ये घाण देखील जमा होणार नाही यामुळे हे खूपच आवश्यक आहे कि आठवड्यामधून कमीत कमी एकदा तर आपल्या मुलांची नखे अवश्य कापावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने