प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला केळी मिळतात आणि अनेक लोक हे आवडीने खातात कारण याला सोलण्यास जास्त मेहनत लागत नाही. वास्तविक आपण केळी खाण्याचे फायदे तर अनेक ठिकाणी वाचले असतील. पण कदाचित तुम्हाला केळीच्या सालीचे फायदे माहिती नसतील.

बहुतेक लोक केळी सालीसोबत खातात आणि काही लोक केळीची साल तुपामध्ये फ्राय करून खातात कारण केळीच्या सालीचे सेवन आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. अशामध्ये आज आपण केळीच्या सालीचे फायदे जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला शूज किंवा सँडल घातल्याने गाठ झाली असेल किंवा तुमच्या पायाची त्वचा रठ झाली असेल तर आपण केळीच्या सालीला आपल्या पायाला बांधावे आणि नंतर मोजे घालून झोपावे. सकाळी उठून केळीची साल काढून टाकावी. असे काही दिवस केल्यास पायाची त्वचा मुलायम होईल.

चेहऱ्यावर मुरूम, फोड्या सतत येत असतील तर तुम्ही केळीची साल घेऊन चेहऱ्यावर चांगली रगडावी. असे काही दिवस सतत करावे. असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील मुरूम, फोड्या दूर होतील आणि चेहरा सुंदर आणि तजेलदार होईल.

जर चेहऱ्यावर सुरुकुत्या पडल्या असतील आणि तुम्हाला यातून सुटका मिळवायची असेल तर केळीची साल चेहऱ्यावर चांगली रगडावी. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरुकुत्या दूर होतील आणि तुम्ही पुन्हा तरुण दिसू लागल.

शरीराच्या एखाद्या भागावर जखमेचे निशाण असतील आणि तुम्हाला ते मिटवायचे असतील तर केळीची साल जखमेच्या निशाणावर दररोज थोडी थोडी रगडावी. असे केल्याने तुमच्या जखमेचे निशाण कायमचे निघून जाईल.

दाताच्या पिवळसरपणाने त्रस्त असाल तर केळीची साल घेऊन दररोज सकाळी दातांवर घासावी. असे केल्याने दातांचा पिवळसरपणा हळू हळू दूर होऊ लागेल आणि तुमचे दात दुधासारखे पांढरे होतील, असे सतत एक आठवडा करावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने