किचनमध्ये चमकणारी भांडी ठेवल्यास किचनचे सौंदर्य आणखीनच वाढते, पण अनेक वेळा असे होते कि स्वयंपाक करताना आपले लक्ष विचलित होते आणि भांडी जळतात. अशामध्ये भांडी सहज साफ करता येत नाहीत आणि साफ करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.

पण तुम्ही हे उपाय वापरून जळलेली भांडी सहजरीत्या साफ करू शकता. विशेष गोष्ट हि आहे कि अशी भांडी साफ करण्यासाठी तुम्हाला मार्केटमधून कोणतीही वस्तू खरेदी करायची गरज नाही, घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध वस्तूंद्वारे आपण भांड्यांना सहजपणे आणि खूप कमी वेळामध्ये स्वच्छ करू शकतो.

जळालेल्या भांड्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाका. नंतर दोन चमचा लिंबाचा रस आणि दोन कप गरम पाणी टाका. यानंतर स्टीलच्या स्क्रबरने साफ करून घ्या. तुमचे जळालेले भांडे चमकू लागेल. एक कच्चा लिंबू घ्या आणि याला भांड्याच्या जळालेल्या भागावर रगडा. नंतर यामध्ये तीन कप गरम पाणी टाका. आता ब्रशने जळालेल्या डागाचे निशाण साफ करून घ्या. हे खूपच सहजरीत्या साफ होऊन जाईल.

जळालेल्या भांड्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून चांगले उकळून घ्या. याला जवळ जवळ चार मिनिटे चांगले उकळा. नंतर जळालेल्या डागाला भांडी धुवायच्या तारने किंवा ब्रशने साफ करून घ्या. जळालेली भांडी साफ करण्यासाठी टमाटे खूपच प्रभावशाली आहे. जळालेल्या भांड्यामध्ये टमाट्याचा रस आणि पाणी मिसळून चांगले गरम करा आणि जळालेल्या भांड्याच्या भागाला रगडून साफ करून घ्या. भांड्याचा जळालेला भाग सहजपणे निघून जाईल आणि भांडे चमकू लागेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने