झोपण्यापूर्वी अनेक लोक थकव्यामुळे आपल्या स्कीनसाठी काहीही करू शकत नाहीत, पण जर हि सवय थोडी बदलली तर याचा आपल्याला खूप फायदा मिळू शकतो. दिवसभर धावपळ झाल्यामुळे स्कीन रुटीनकडे लक्ष देता येत नाही. पण जर रात्री झोपतेवेळी काही कामे केल्यास खूप काही होऊ शकते. ग्लोइंग स्कीन मिळवण्यासाठी इतके तर केले जाऊ शकतेच ना.

काही स्त्रिया दिवसभर आपल्या स्कीनची देखभाल चांगल्या प्रकारे करतात पण रात्रीच्या वेळी शारीरिक थकव्यामुळे याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि रात्रीच्या वेळी जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपले शारीरिक अंग आपली कामे व्यवस्थित करत असतात. ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटते. जर तुम्हाला देखील ग्लोइंग स्कीन हवी असेल आणि नेहमी ग्लोइंग स्कीन राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हि ५ कामे जरूर करावीत.

पाण्याने चेहरा धुवायला विसरू नये

स्कीनच्या योग्य देखभालीसाठी किंवा असे म्हणा कि योग्य आरामासाठी आपण काही गोष्टी करणे खूपच आवश्यक असते. ज्यामुळे आपली स्कीन सुंदर मुलायम आणि चमकदार बनू शकते. त्वचेच्या देखभालीसाठी रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टींचा अंमल करणे जरुरीचे असते.

यामध्ये सर्वात पहिला येते स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ धुणे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. स्कीनची अशुद्धी दूर करण्यासाठी पाणी खूपच आवश्यक असते. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी थंड आणि स्वच्छ पाण्याने आपली स्कीन साफ करूनच झोपावे.

हर्बल फेस मास्कचा वापर

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावला जाणारा हर्बल फेस मास्क स्कीनला स्वस्थ आणि पोषक ठेवण्यासाठी खूपच उत्तम मार्ग आहे. याचा वापर केल्याने स्कीनमधील हरवलेल्या पोषक तत्वांशिवाय ओलावा देखील भरून निघतो. जे आपल्या स्कीनसाठी प्रत्येक प्रकारे उपयुक्त आहे. गरमीच्या दिवसांमध्ये मुलतानी माती, काकडी किंवा चंदनची पावडरदेखील लावू शकता.

डोळ्यांची विशेष काळजी

रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर क्रीम आणि डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकायला विसरू नये. डोळ्यांचा पृष्ठभाग खूपच संवेदनशील असो आणि यामुळे याची विशेष काळजी घेणे खूपच जरुरीचे असते. डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर होणारे काळे डाग दूर करण्यासोबतच सुरकुत्या दूर करण्यासाठी डोळ्यांच्या क्रीमचा वापर करणे जरुरीचे असते यामुळे रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या खाली क्रीम लावायला विसरू नये त्याचबरोबर डोळ्यांमध्ये ड्रॉप घालायला देखील विसरू नये.

स्किनला मॉइश्चरायझ करायला विसरू नका

कोरड्या त्वचेमध्ये ओलावा आणण्यासही फक्त चेहऱ्यावरच नाही तर पूर्ण शरीरावर क्रीम, लोशन किंवा नारळाच्या तेलाचा प्रयोग करून स्कीनवर ओलावा आणू शकतो. यामुळे आपल्या त्वचेवर नेहमी ओलावा टिकून राहील आणि अकाली आलेल्या सुरकुत्या देखील ठीक होतील.

केसांची मालिश करावी

स्कीन सोबत तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांची मालिश देखील करू शकता. असे केल्याने आपला पूर्ण दिवसाचा थकवा निघून जाईल आणि गाढ झोप देखील येईल. गाढ झोपेमुळे आपली त्वचा देखील ग्लो करू लागेल.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने