मनुष्याचा जन्म कोणत्या महिन्यामध्ये झाला आहे याचा प्रभाव त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. इतकेच नाही प्रेम संबंधावर देखील याचा प्रभाव पाहायला मिळतो. तुम्हाला माहिती आहे का कि जन्माच्या महिन्यावरून मनुष्याचा स्वभाव कसा असतो. जर माहिती नसेल तर आज आपण जाणून घेणार आहोत कि कोणत्या महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो.

जानेवारी: या महिन्यामध्ये जन्म घेणारा व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत थोडा जिद्दी स्वभावाचा असतो. अशामध्ये व्यक्ती आपल्या नात्याला चांगले बनवण्यासाठी नवीन नवीन प्रयत्न करत राहते. या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या महिला प्रेम संबंधित प्रकरणांमध्ये उदासीन असतात. अशाप्रकारच्या महिला प्रेमाच्या बाबतीत पुढाकार घेत नाहीत.

फेब्रुवारी: फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यांचा जन्म होतो असे लोक प्रेम संबंधांमध्ये रोमांच जास्त पसंत करतात. जेव्हा हे दुखी होतात तेव्हा एकटे राहणे जास्त पसंत करतात. या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींमध्ये जास्त प्रेम असते पण त्या ते दाखवून देत नाहीत. अर्थात यांना आपल्या कुटुंबाच्या मान-मर्यादेची जास्त काळजी असते.

मार्च: मार्च महिन्यामध्ये जन्म घेणारी व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत उदार असते. या प्रकारच्या व्यक्ती आपल्या प्रेमी किंवा जोडीदारासोबत बराच वेळ घालवू इच्छित असतात. या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली आपले प्रेम व्यक्त करण्यामध्ये कठीण अनुभव करतात.

एप्रिल: या महिन्यामध्ये जन्म घेणारी व्यक्ती उर्जावन असते. यांची उर्जा जीवनामधील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रदर्शित होते. हे आपल्या जोडीदारासोबत जास्त प्रेम करतात. या कारणामुळे यांचे वैवाहिक आयुष्य आनंदाने भरलेले असते. या महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुली हसमुख आणि हट्टी स्वभावाच्या असतात. प्रेमाच्या बाबतीत देखील या आपला हट्ट सोडत नाहीत.

मे: मे महिन्यामध्ये जन्म घेणारी व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खुल्या स्वभावाची असते. याच्या उलट मुली लाजाळू स्वभावाच्या असतात. या आपल्या जोडीदारासोबत चांगले संबंध बनवून ठेवतात. याशिवाय या अंतरंग संबंध बनवण्यासाठी नेहमी उत्साहित असतात.

जून: या महिन्यामध्ये जन्म घेणारी व्यक्ती क्रोधी स्वभावाची असते. असे असून देखील यांच्यामध्ये प्रेम खूप असते. या महिन्यामध्ये जन्मलेल्या स्त्रिया मनमिळाऊ आणि चलाख असतात. याप्रकारे मुली दुसऱ्यांसोबत लवकर मैत्री करतात आणि लवकर तोडतात देखील.

जुलै: जुलै महिन्यामध्ये जन्म घेणारी व्यक्ती इमोशनल आणि प्रामाणिक स्वभावाची असते. हे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात. या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली आपल्या नात्याच्या मर्यादेला चांगल्या प्रकारे साकारतात. यांचे वैवाहिक जीवन सुखांनी भरलेले असते.

ऑगस्ट: ऑगस्ट महिन्यामध्ये जन्म घेणारी व्यक्ती उदार आणि भावूक स्वभावाची असते. हे आपल्या जोडोदाराची चांगली काळजी घेतात आणि वैवाहिक आयुष्यामध्ये देखील यांचा स्वभाव व्यावहारिक प्रकारचा असतो.

सप्टेंबर: सप्टेंबर महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्तीचे आपल्या जोडीदारासोबत भावूक नाते असते. या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली आपले प्रेम मनामध्ये ठेवतात आणि याबद्दल ते कोणासमोर देखील बोलण्यास थोडा संकोच करतात.

ऑक्टोबर: ऑक्टोबर महिन्यामध्ये थंडीची सुरुवात होते यामुळे या महिन्यामध्ये जन्म घेणारी व्यक्ती रुमानी स्वभावाची असते. मुली अशा व्यक्तीसोबत आपल्या नाते कायम ठेवतात ज्या यांना वास्तवात पसंत करतात. या मुली भावूक स्वभावाच्या असतात.

नोव्हेंबर: नोव्हेंबर महिन्यामध्ये जन्म घेणारी व्यक्ती आपल्या प्रेम संबंधांमध्ये रोमांच आणि नवीनपणा आणण्याचा प्रयत्न करते. यांना आपल्या जीवनामधील प्रत्येक क्षणांना रोमांचक बनवणे जास्त आवडते.

डिसेंबर: डिसेंबर महिन्यामध्ये खूप जास्त थंडी पडते. या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्तीचे जीवन सुखमय असते कारण प्रेमासंबंधित प्रकरणांमध्ये यांची विचारसरणी रचनात्मक असते. पण या महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुली प्रेमाच्या बाबतीत अधिक जोश दाखवत नाहीत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने