‘म्हारी छोरियां छोरो से कम है के’ दंगल चित्रपटामधील हा डायलॉग तर आपल्याला माहितीच असेल. आज आपण ज्या महिलेबद्दल जाणून घेणार आहोत तिच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. सध्याच्या काळामध्ये मुली देखील मुलांना कडवी टक्कर देत आहेत.
यामुळे कोणत्याही महिलेला कधीच कमजोर समजू नये. पण एक पती असा देखील आहे ज्याने आपल्या पत्नीला जाड असल्यामुळे तिला सोडून दिले होते आणि नंतर त्याला आपल्या या निर्णयाबद्दल पश्चात्ताप करावा लागला.
जाड असल्यामुळे पतीने सोडले होते
रुबी नावाची हि महिला एका ६ वर्षाच्या मुलाची आहे. लग्नाच्या काही दिवसांमध्ये रुबीचे वजन खूपच वाढू लागले होते ज्यामुळे तिचा पती तिच्यावर खूपच नाराज होता. यांच्या लग्नाला थोडेच दिवस लोटले होते आणि दोघांमध्ये तिच्या वजनामुळे तक्रार होऊ लागली.
रुबीच्या पतीने यामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि तो तिला हे म्हणून सोडून निघून गेला कि तू खूपच जाड आहेत आणि वजन देखील जास्त आहे. तुझ्यामध्ये मला आता काहीच इंटरेस्ट राहिला नाही. ज्यानंतर रुबीला खूपच वाईट वाटले.
तेव्हा रुबीने हा निश्चय केला कि वजन कमी करून आपले शरीर फिट बनवायचे आणि ती मेहनत करू लागली. तिने धावण्यापासून सुरुवात केली आणि हळू हळू तिला सवय लागून गेली. त्यावेळी रुबीला स्वतःला देखील माहिती नव्हते कि तिची हि सवय पुढे जाऊन तिची आवड बनेल. रुबीने खूप मेहनत करून आपले वजन कमी केले आणि शरीराला मजबूत बनवले आणि आज ती बॉडी बिल्डींगमध्ये राष्ट्रीय स्तराची पदक विजेती आहे. रुबीने बॉडी बिल्डींगमध्ये अनेक पदके जिंकली आहेत.
सिद्ध केले कि महिला काहीही करू शकतात
रुबीने आसाममध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरीय बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप जिंकली आहे. याशिवाय तिने चेन्नईमध्ये मिस फिटनेसचा किताब देखील जिंकला आहे. तिने बॉडी बिल्डींग आणि फिटनेसमध्ये आयएफए क्लासिक नॅशनल प्रो-एएम चॅम्पियनशिप जिंकून देशामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे आणि हे सिद्ध केले कि जर एका महिलेने निश्चय केला तर ती काहीही करू शकते. आता तर रुबीसाठी फिटनेस ट्रेनिंग अॅ’डि’क्श’न बनले आहे.
लोक उडवायचे टिंगल आज करतात कौतुक
रुबी सांगते कि हे वाटते तितके सोपे नव्हते. तिला सुरुवातीला खूप समस्यांचा सामना करावा लागला होता. ज्यावेळी रुबीला पतीने सोडून दिले होते तेव्हा ती आई बनणार होती. अश्या स्थितीमध्ये तिने जिम जॉईन केली आणि कधीच खचून गेली नाही. रुबीचे म्हणणे आहे कि जे लोक सुरुवातीला माझी टिंगल उडवायचे माझ्या तोंडावर हसायचे आज तेच लोक माझे कौतुक करतात.
६ महिन्यांमध्ये बनवली स्टील बॉडी
रुबी एक टीचर होती जी शाळेमध्ये मुलांना शिकवत होती पण आपल्या ध्येयासाठी तिने ती नोकरी सोडून दिली आणि आपला बहुतेक वेळ ती जिममध्ये घालवू लागली. जिममध्ये तिची भेट फिटनेस ट्रेनर कार्तिकशी झाली.
कार्तिकने सांगितले कि आतापर्यंत मी अनेक महिलांना ट्रेनिंग दिली आहे पण रुबीसारखा आत्मविश्वास इतर कोणामध्ये पाहिला नाही. मी रुबीसाठी १ वर्षाचा शेड्यूल बनवला होता पण तिने सहा महिन्यामध्येच स्टीलसारखी बॉडी बनवली.
टिप्पणी पोस्ट करा