आजच्या काळामध्ये लठ्ठपणा सर्वात गंभीर समस्या बनत चालली आहे. लठ्ठ लोकांबद्दल बोलायचे झाले तर भारत दुसऱ्या नंबरवर येतो. जिथे ४७ टक्के लोक हे लठ्ठपणाचा शिकार आहेत. अनेक लोकांना लठ्ठपणाची समस्या त्यांच्या जीन्समुळे मिळते. तर काही लोक खराब लाईफस्टाईल आणि चुकीच्या आहारामुळे लठ्ठ होऊ लागतात. नंतर हे लोक वजन कमी करण्यासाठी जिम आणि नंतर डायटचा आधार घेतात.

जिम वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पण त्यासाठी कठीण मेहनत करण्याची आवश्यकता आहे. जिम जॉईन करून वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी टाईम आणि डेडीकेशन जरुरीचे आहे. यासोबत जिम जॉईन करून वजन कमी करण्यासाठी पेशंसची देखील आवश्यकता आहे कारण वर्कआउट केल्याने वजन हळू हळू कमी होते.

अनेक लोक डायटिंग करून देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण डायट करण्याची देखील योग्य पद्धत आहे. काही लोक डॉक्टरांच्या सल्ला घेतल्याशिवाय डायट सुरु करतात जे पुढे जाऊन आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. जिमप्रमाणे डायटने देखील वजन कमी करण्यासाठी वेळ लागतो कारण हि एक स्लो प्रोसेस आहे.

पण आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा एक सरळ आणि सोपा उपाय सांगणार आहोत. या उपायाबद्द्ल कदाचित याआधी देखील ऐकले असेल. या सोप्या घरगुती उपायाने तुम्ही काही दिवसांमध्येच वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला काही सामग्रीची आवश्यकता पडेल. जी आहे जिरे.

वास्तविक जीऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक आणि फॉस्फरस असते जे आपले पाचन तंत्र ठीक करून वजन कमी करण्यास मदत करते. जीऱ्याचे वजन कमी करण्यासाठी याचे कसे सेवन केले जाते चला तर जाणून घेऊया. यासाठी लागणारी सामग्री पुढील प्रमाणे आहे. हा रामबाण उपाय बनवण्यासाठी ज्या दोन वस्तूंची आवश्यकता पडणार आहे ती आहे लिंबू आणि जिरे पावडर.

याला बनवण्यासाठी सर्वात पहिला जिरे घेऊन ते मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्या. जेव्हा जीऱ्याची पावडर बनेल तेव्हा एक लिंबू घेऊन तो अर्धा कापावा. एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा बारीक केलेले जिरे आणि अर्धा कापलेल्या लिंबूचा रस टाकून हे चांगले एकत्र करावे. लक्षात ठेवा हे आपल्याला गरमच प्यायचे आहे आणि सकाळी उपाशी पोटी याचे सेवन केल्याने त्याचा चांगला रिजल्ट मिळतो.

प्यायल्यानंतर दोन तीन तास काहीच खाऊ नये. याचे सेवन काही दिवस सतत करावे. काही दिवसांमध्ये तुम्हाला शरीरामध्ये बदल झालेला पाहायला मिळेल. तुम्हाला हलके झाल्याची जाणीव होईल आणि पोटावरील चरबी कमी झाल्याचे देखील पाहायला मिळेल. या वेट लॉस ड्रिंकला कमी वेळामध्ये वजन कमी करण्याचा सर्वात उत्तम मार्ग मानले गेले आहे. एकदा तुम्ही देखील या ड्रिंकचा वापर करून पहा काही दिवसांमध्ये निश्चितच फरक जाणवेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने