ज्योतिष शास्त्र, वास्तू शास्त्र, सामुद्रिक शास्त्र, अशा काही विधी आहेत ज्यांच्या प्रयोगाने आपण आयुष्यामध्ये येत असलेल्या संकटांना वळवू शकतो. त्रास झाल्यास लोक या शास्त्रीय उपायांचा प्रयोग करतात. वर्तमान काळामध्ये पूजा पाठ करण्याची परंपरा पाळली जात आहे. पूजा केल्याने मन:शांती प्राप्त होते सर्व मनोकामना पूर्ण होतात.

कुटुंबावर कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाहीत. पण पूजा करण्याचे देखील काही नियम सांगितले गेले आहेत ज्यांचे पालन करणे खूपच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला एक असा अनोखा उपया सांगणार आहोत जो केल्याने तुमच्या पैशा संबंधी समस्या संपुष्टात येतील.

हा उपाय देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. देवी लक्ष्मीला धन संपत्तीची देवी म्हंटले जाते. असे मानले जाते कि जो देखील देवी लक्ष्मीला खुश करतो त्याला धन संपत्तीची कधी कमी होत नाही. आपण देखील लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय पाहिले असतील पण हा उपाय खूपच वेगळा आहे. जर तुम्ही हा उपाय पूर्ण नियम आणि कायद्याने केलात तर तुम्हाला आयुष्यभरासाठी पैश्यांसंबंधी समस्या येणार नाहीत. चला तर पाहूया तो कोणता उपाय आहे.

अशाप्रकारे प्रसन्न करा देवी लक्ष्मीला: हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खालील वस्तू आवश्यक असतील. फुलांची माळ, तांब्याचा कलश, शंख, रुमाल, चांदीचे नाणे, सामान्य नाणे, पांढरे फुल, ५ तुपाचे दिवे, ११ अगरबत्ती आणि एक नारळ.

सर्वात पहिला तुम्ही देवी लक्ष्मीच्या समोर ५ तुपाचे दिवे लावावे. हे तुम्ही वेगळे वेगळे देखील करू शकता किंवा ५ दिवे एकत्र देखील लावू शकता. यानंतर देवी लक्ष्मीचे नाव घेत ११ अगरबत्ती देखील लावून समोर ठेवावे. आता एक तांब्याचा कलश भरा आणि त्यावे नारळ ठेवा. यानंतर फुलाची माळ देवी लक्ष्मीच्या प्रतिमेवर घाला.

आता देवी लक्ष्मीच्या समोर एक रुमाल ठेवा. या रुमालावर एक चांदीचे नाणे किंवा एक सामान्य नाणे ठेवा. या नाण्यांचे कुंकू, हळद आणि तांदूळ टाकून पूजा करा. आता शंख वाजवा आणि देवी लक्ष्मीची आरती करा. आरती समाप्त होताच पुन्हा शंख वाजवा.

आता पहिली आरती देवी लक्ष्मीला द्या आणि दुसरी आरती रूमालावर ठेवलेल्या नाण्याला द्या. यानंतर तुम्ही देवीच्या समोर हात जोडून माथा टेका आणि आपल्या समस्या सांगा. हे सर्व कार्य झाल्यानंतर तुम्ही चांदीच्या नाण्याला घरच्या तिजोरीमध्ये ठेवा.

यामुळे तुमच्या घरामधील पैशांची आवक वाढेल आणि त्याचबरोबर घरामध्ये ठेवलेला पैसा कमी खर्च होईल. तुम्ही रूमालावर जे सामान्य नाणे ठेवले होते त्याला रूमालासहित एखाद्या गरीब व्यक्तीला द्या. पूजेमध्ये जो नारळ वापरले होते ते फोडून घरच्या सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने