या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला वेळ नसतो आणि म्हणूनच सकाळी ९ ते ५ पर्यंत कोणालाही आपली स्वताची कामे करायला वेळ मिळत नाही. यामुळे बरेच लोक आपले बहुतेक काम रात्रीच्या वेळी करतात, जसे एक काम आहे कपडे धुण्याचे. लोकांना बर्याीचदा सकाळी कपडे धुण्यासाठी वेळ मिळत नाही, म्हणूनच रात्री ते कपडे धुतात. यादरम्यान लोक अनेकदा आपल्या कपड्यांच्या बाबतीत एक मोठी चूक करतात. ज्यामुळे या कपड्यांच्या माध्यमातून तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते.

जरी आपणास विचित्र वाटत असेल परंतु हे पूर्णपणे सत्य आहे, सध्याच्या क्षणी यावर विश्वास ठेवणे कठीण आहे परंतु हे खरे आहे. बर्यााच वेळा असे घडते की आपल्या बहुतेकवेळा नाईलाजाने रात्रीचे काम करावे लागते, परंतु कोणालाही माहिती नाही की शास्त्रामध्ये रात्री काही कामे करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

जर शास्त्रानुसार मानले तर आपण दिवसाची कामे रात्री कधीच करू नयेत. इतकेच नाही तर रात्री कपडे धुणारे लोक घरात नकारात्मक उर्जा आणण्याचे काम करतात. आता तुम्ही विचार केला असेल कि यामागे काय तथ्ये दिली आहेत, म्हणून आज याच तथ्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

खरे तर जपान किंवा चीन देशात असा विश्वास आहे की जो कोणी दिवसाचे काम रात्री करतो, म्हणजे जर ते कपडे धुतात आणि रात्री त्यांना बाहेर सुखायला टाकतात तेव्हा रात्रीच्या वेळी बाहेरची नकारात्मक उर्जा कपड्यांमध्ये समाहित होते आणि त्या कपड्यांच्या साहाय्याने ती व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते यामुळे त्या व्यक्तीला हानी पोहोचते.

आपण असे केल्यास आपण अनेक प्रकारच्या अडचणीत येऊ शकतो. सूर्यप्रकाशामध्ये कपडे सुकवल्यामुळे आपल्या कपड्यांमधून नकारात्मक शक्ती बाहेर निघून कपड्यांच्या आत एक नवीन सकारात्मक उर्जेचा संचार होतो. परंतु जेव्हा आपण रात्री बाहेर आपले कपडे सुखवतो तेव्हा चंद्राच्या प्रकाशात कपड्यांमधून नकारात्मक उर्जा बाहेर येऊ शकत नाही आणि रात्री कपडे धुवून व वाळवून ते घालण्याचा आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.

दुसरे कारण असे आहे की जेव्हा सूर्यप्रकाशात कपडे वाळवले जातात, तेव्हा त्या कपड्यांमध्ये असलेले सर्व सूक्ष्मजंतू आणि हानिकारक जीवाणू सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे नष्ट होत असतात. परंतु जेव्हा आपण रात्री कपडे सुकवतो तेव्हा कपडे हळूहळू कोरडे होतात परंतु सूर्यप्रकाश आणि उष्मा नसल्यामुळे कपड्यांमधील हानीकारक जंतू नष्ट होत नाहीत जे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि अनेक भयानक आजार यामुळे आपल्याला होवू शकतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने