आपल्या देशात असंख्य अब्जाधीश आहेत, ज्यांचे नाव संपूर्ण जगभर घेतले जाते. मुकेश अंबानी यांचे नाव या यादीमध्ये प्रथम येते. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. वर्ष २०१८ मध्ये मुकेश अंबानी यांनी आपली मुलगी ईशा अंबानी हिचे लग्न अगदी धुमधडाक्यात केले.

असे म्हंटले जाते की या लग्नात सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपये पाण्यासारखे खर्च करण्यात आले होते. हे भारतातील आता पर्यंतचे सर्वात महागडे लग्न होते. आपल्याला माहित आहे की भारतात अनेक बडे बिजनेस मॅन आहेत, ज्यांच्या मुली अजूनही लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. आज आम्ही आपल्याला अशाच भारतातील धनकुबेरांच्या मुलींची ओळख करून देणार आहोत.

अनन्याश्री बिर्ला

अनन्यश्री ही भारतातील बिजनेस मॅन कुमार मंगलम यांची मुलगी आहे. ती सध्या २५ वर्षांची आहे, ती एक भारतीय गायिका व गीतकार असून संपूर्ण जगभर तिची ओळख आहे. तसेच ती आदित्य बिर्ला ग्रुपची अध्यक्ष आहे. अनन्याला तिच्या कामासाठी आणि उद्योजकतेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत यामध्ये यंग बिझनेस पर्सनल ईटी मानाचे ट्रेंडेस्टर अॅकवॉर्ड यांचा देखील समावेश आहे. अशी ही अनन्याश्री अजून आपल्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहे.

नव्या नंदा

नव्या नंदा ही अमिताभ बच्चन यांची नात असून तिचे वडील निखिल नंदा हे देशातील एक सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, आपल्याला कदाचित माहित नसेल पण इंडियन मल्टीनेशनल कंपनी एस्कॉर्ट्स लिमिटेड कंपनीचे ती अध्यक्ष आहे. नव्याबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावत आहे. कदाचित भविष्यात ती देखील चित्रपटांमध्ये दिसू शकेल.

यशस्विनी जिंदाल

यशस्विनी देशातील नामांकित उद्योगपती नवीन जिंदाल यांची मुलगी आहे. यशस्विनी सध्या २१ वर्षांची असून तिला नृत्याची खूप आवड आहे. ती कुचीपुडी नृत्यात तज्ज्ञ असून ती सध्या लंडन मध्ये आपले शिक्षण घेत आहे.

जयंती चौहान

जयंती चौहान ही बिस्लेरी ग्रुपचे मालक रमेश चौहान यांची मुलगी आहे. आपल्याला कदाचित माहित नसेल पण तिचे नाव हे तिच्या आजोबाच्या म्हणजेच जयंतीलाल चौहान यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ते बिस्लेरी ग्रुपचे संस्थापक होते. जयंती चौहान ही बिस्लेरी ग्रुपची संचालक होती. पण सध्या ती लंडन मध्ये वास्तव्यास असून २०१० मध्ये तिने या कंपनीचे संचालक पद सोडले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने