भले हि शेक्सपियरने असे म्हटले असले की व्यक्तीच्या नावामुळे त्याच्यावर काहीही फरक पडत नसतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे नाव खूप महत्वाचे मानले जाते. ज्योतिष शास्त्राद्वारे आपण एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराने त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेवू शकतो.

आपल्या नावाच पाहिलं अक्षर हे आपल्या आयुष्यात होणाऱ्या सर्व गोष्टींशी निगडीत असते. जर आपण आपल्या नावाच्या नुसार आपला जीवनसाथी शोधला तर दोघांचेही मन जुळतील आणि भावी आयुष्यात याचा आपल्याला पुरेपूर फायदा देखील होईल. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार ८०% मुलींमध्ये हि गोष्ट पाहिली गेली आहे. या लेखाद्वारे आपण मुलींच्या नावाच्या पहिल्या अक्षराने त्यांचा स्वभाव कसा असतो ते जाणून घेणार आहोत.

B नावाच्या मुली: ज्या मुलींचे नाव B पासून सुरु होते त्या मनाने अगदी निर्मळ असतात. पण लोकांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर त्यांना खूप लवकर राग येतो. पण तरीही या मुलींना बरेच जण पसंत करत असतात. प्रत्येकाला अशा मुली खूप आवडतात. कारण बर्याहचदा त्या आपल्या स्पष्ट बोलण्याने लोकांची मने जिंकतात.

H नावाच्या मुली: ज्या मुलींचे नाव H पासून सुरू होते त्यांना त्यांच्या घराची प्रतिष्ठा खूप महत्वाची असेत. ते त्यांच्या घराची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. अशा मुली सर्वांशी समजुतीने वागत असतात. पण जर त्यांना कधी राग आला तर ते आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही माफ करत नाही. या नावाच्या मुली आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

L नावाच्या मुली: ज्या मुलीचे नाव L पासून सुरु होते त्या मुली साध्या सरळ स्वभावाच्या असतात. या मुली कधीही कोणास फसवत नाहीत. आपली प्रतिमा खराब करू होईल असे कोणतेही काम करण्यास त्यांना आवडत नाही. या मुली प्रत्येक गोष्टीत पुढे असतात. पण त्यांना त्यांचा राग कमकुवत बनवतो. या नावाच्या मुली देखील आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

P नावाच्या मुली: P नावाच्या मुली दोन स्वभावाच्या आढळतात, एकतर त्या पूर्णपणे शांत असतात किंवा खूप बिंधास स्वभावाच्या असतात. या मुली खूप बोलक्या तसेच आपल्या स्वाभिमानाशी एकनिष्ठ राहणाऱ्या असतात. पण जेव्हा यांना राग येतो तेव्हा या स्वतःवरच राग काढतात आणि स्वतःलाच त्रास करून घेतात.

S नावाच्या मुली: S नावाच्या मुली स्वत:शी तर इमानदार असतातच परंतु त्या आपल्या पती व कुटुंबाशी देखील इमानदार असतात. पण या सुद्धा थोड्या रागीट स्वभावाच्या असतात. जरी या रागीट स्वभावाच्या जरूर असतील परंतु त्या तितक्याच लवकर स्वत:ला मनवतात सुद्धा आणि शांत होतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने