आचार्य चाणक्य हे एक कुशल अर्थशास्त्रज्ञांसह एक महान शिक्षणतज्ज्ञ देखील मानले जातात. आचार्य चाणक्य यांनी सामाजिक जीवनाशी सं-बंधित अनेक तथ्यांचा अभ्यास केला आहे आणि आनंदी आयुष्य जगण्याचे मार्ग दिले आहेत. आचार्य चाणक्य यांची नमूद केलेली धोरणे अवघड असली तरी असे म्हटले जाते की ज्यांनी हे धोरणे स्वीकारली आहेत त्यांना यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात त्रास सहन करावा लागतो. निती शास्त्राच्या मते जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा थेट दु:ख आणि आनंदाशी सं-बंध असतो. वाईट वेळ ही त्या व्यक्तीची परीक्षा घेत असते. या काळात जो धैर्य व संयम राखतो तो यशस्वी होतो.

आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊया, निती शास्त्राच्या मते एखाद्या व्यक्तीच्या वाईट आणि कठीण काळात या ५ गोष्टी उपयोगी येत असतात. या गोष्टींची साथ शेवटपर्यंत राहते म्हणून त्यांचा सन्मान आणि काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे. चला तर जाणून घेवूया खास ५ गोष्टीबद्दल.

१. धैर्य आणि संयम: चाणक्य म्हणतात की एखाद्याने नेहमी धैर्य आणि संयमाने काम केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने कठीण काळासाठी सदैव तयार असले पाहिजे. फक्त वाईट काळात धीर धरणे योग्य आहे. चाणक्य म्हणतात की धैर्य आणि संयम ठेवून कठीण काळात प्रगती करणारे लोकच यशस्वी होतात.

२. देणगी देणे आणि संपत्ती साठवणे: चाणक्य असा विश्वास करतात की प्रत्येक व्यक्तीला संपत्ती साठवणे फार महत्वाचे आहे. प्रत्येकाने वाईट काळासाठी पैसे वाचवावेत. चाणक्य म्हणतात की श्रीमंत लोकांनी गरजूंना दान करावे आणि आपण दिलेली देणगी ही नेहमी गुप्त ठेवली पाहिजे.

३. निर्णय घेण्याची क्षमता: चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीने कधीच घाई गडबडीत निर्णय घेता कामा नये. नीतिशास्त्रानुसार असे केल्याने चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. प्रगती करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

४. आत्मविश्वास: चाणक्य म्हणतात की व्यक्तीजवळ आत्मविश्वास असणे खूप महत्वाचे आहे. कोणाच्या बोलण्यातून तुमचा आत्मविश्वास डगमगला जावू नये. चाणक्य म्हणतात की जे लोक अति स्तुती करतात आणि पापाने वाईट करतात अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये.

५. ज्ञान: चाणक्य म्हणतात की ज्ञान हीच खरी संपत्ती आहे ज्याद्वारे कठीण आणि वाईट वेळेचा सुद्धा सहज सामना करता येतो. चाणक्य म्हणतात की सुशिक्षित आणि जाणकार माणसाला नेहमीच आदर मिळत असतो. ज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक गोष्ट मिळवता येते. कठिण ते कठिण परिस्थतीतून बाहेर पडता येतं.

सन्मान, धन, देखील ज्ञान असलेल्या व्यक्तीकडे आपोआप येतं. अर्थात शिक्षण हा मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र आहे. घर, देश, काळ यापासून लांब असलं तरी ज्ञान नेहमी मनुष्याचे रक्षण करतं असतं. ज्ञानी व्यक्तीची ओळख आणि प्रशंसा जीवनकाळापर्यंत तर असतेच आणि मृत्यूनंतर देखील लोकं त्यांनी पसरवलेल्या ज्ञानाचा लाभ घेत असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने