शास्त्र आणि पुराणामध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे ज्याच्या आधारावर आपण मनुष्याचा स्वभाव आणि येणाऱ्या काळाबद्दल माहिती प्राप्त करू शकतो. या शास्त्रामध्ये एक शास्त्र आहे सामुद्रिक शास्त्र. सामुद्रिक शास्त्रामध्ये या गोष्टीचे विवरण केले गेले आहे कि आपण मनुष्याच्या शरीर रचनेला पाहून त्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो. या शास्त्रामध्ये अशी बरीच माहिती दिली गेली आहे ज्यामध्ये मनुष्याचा प्रत्येक रंग त्याच्या स्वभावाबद्दल काहीना काही सांगतो.

सामुद्रिक शास्त्रामध्ये दातांचा आकार देखील मनुष्याचा स्वभाव सांगतो. ज्या व्यक्तीच्या दातांमध्ये गॅप असतो त्यांचे नशीब कसे राहील याची सर्व माहिती त्याच्या दातांना पाहून मिळू शकते. व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याचा देखील अंदाज लावला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या लेखामधून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याबद्दल त्याच्या दातावरून माहिती प्राप्त करू शकतो हे सांगणार आहोत.

चला तर जाणून घेऊया व्यक्तीच्या दातांपासून कसे जाणून घ्यायचा त्याचा स्वभाव आणि भविष्य

सरळ आणि सपाट दात असणारे: ज्या व्यक्तींचे दात सरळ आणि सपाट असतात. असे लोक धनवान असतात. या व्यक्तींना दिखावा करणे जरासुद्धा पसंत नसते. या प्रकारचे लोक कोणाची नोकरी करणे देखील पसंत करत नाहीत. हे स्वतःचा व्यापार करतात आणि त्यांचा स्वभाव खूपच मनमिळाऊ असतो.

दात बाहेर असलेले: ज्या व्यक्तीचे दात थोडे बाहेर आलेले असतात असे व्यक्ती खूपच बोलक्या स्वभावाचे असतात. हे आपली गोष्ट मनवून घेण्यामध्ये खूपच तरबेज असतात. जर आपण त्यांच्या स्वभावाबदल बोलायचे झाले तर हे कधी हसमुख आणि कधी रागीट स्वभावाचे देखील असतात.

दातांमध्ये गॅप असणारे: ज्या व्यक्तींच्या दातांमध्ये थोडा गॅप असतो अशा प्रकारचे व्यक्ती दुसऱ्याच्या धन संपत्तीवर ऐश करणारे मानले जातात. याव्यतिरिक्त संपत्तीच्या बाबतीत हे व्यक्ती खूपच भाग्यवान सिद्ध होतात. कारण या व्यक्तींना वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त होते ज्यामुळे हे आपले आयुष्य सहजपणे व्यतीत करतात. हे व्यक्ती खूपच खर्चिक स्वभावाचे असतात. यांच्याजवळ धन टिकून राहत नाही.

काळे दात असलेले: ज्या व्यक्तींच्या दातांचा रंग हलका काळा असतो असे व्यक्ती लढाऊ स्वभावाचे असतात. हे आपले काम पूर्ण करून घेण्यात चांगलेच पटाईत असतात. अशा प्रकारचे व्यक्ती खूप स्वार्थी देखील असतात.

पिवळे किंवा हलके लाल दात असणारे: ज्या व्यक्तींचे दात पिवळे किंवा हलके लाल असतात असे व्यक्ती खूपच खुल्या मनाचे आणि विश्वसनीय असतात. या व्यक्तींना एकमेकांमध्ये मिसळणे खूप पसंत असते. पण या व्यक्तींना पोटासंबंधी समस्या अधिक असतात.

वाकडे तिकडे दात असणारे: ज्या व्यक्तींचे दात वाकडे तिकडे असतात हे आपल्या आयुष्यामध्ये सतत संघर्ष करत राहतात. अशाप्रकारच्या लोकांवर विश्वास ठेवणे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. असे व्यक्ती कपटी स्वभावाचे असतात.

दातांवर दात असणारे: ज्या व्यक्तींचे दातांवर दात असतात त्यांचे वैवाहिक आयुष्य खुशहाली पूर्वक व्यतीत होते. अशाप्रकारचे दात असणाऱ्या महिला खूपच चतुर आणि शासन करणाऱ्या असतात. याप्रकारचे व्यक्ती देखील साहसी स्वभावाचे असतात.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने