जसे आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे कपडे घालतो तसे त्यांना धुण्याची देखील पद्धत वेगवेगळी असते. कपड्यांना धुण्याच्या पद्धतीने जितका प्रभाव कपड्यांवर पडतो तितकाच प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर देखील पडतो. तथापि आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत जे सर्व कपड्यांना एकत्र वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकतात. पण तुम्हाला माहिती आहे का कि असे करणे धोकादायक देखील असू शकते.

खासकरून जर आपण आपले अंडरगार्मेंट्स बाकी कपड्यांसोबत धुवत असाल तर तुम्हाला सावधान होणाची गरज आहे. असे यासाठी कारण कि हे आपल्या आरोग्यासाठी योग नाही. वास्तविक एका अभ्यासामध्ये हे माहित झाले आहे कि एक जोडी अंडरगार्मेंटमध्ये दररोज जवळ जवळ दहा ग्रॅम मळ लागलेला असतो.

यामुळे जेव्हा आपण अंडरगार्मेंट्स दुसऱ्या कपड्यांसोबत धुतो तेव्हा त्यामध्ये असलेले बॅक्टेरिया दुसऱ्या कपड्यांवर देखील लागतात. ज्यामुळे संक्रमण होण्याचा धोका संभवतो. आता आपण नेहमीप्रमाणे कपडे नॉर्मल पाण्याने धुतो पण अंडरगार्मेंट्स मध्ये असलेले बॅक्टेरिया नॉर्मल पाण्यामध्ये नष्ट होत नाहीत.

यामुळे या कपड्यांना कमीत कमी चाळीस डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या पाण्यामध्येच धुवायला हवे. म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये अंडरगार्मेंट्स धुण्याचा जरा देखील फायदा मिळत नाही. याशिवाय लहान मुले आणि वयोवृद्धांमध्ये रोग प्रतिरोधक क्षमता कमजोर असते. ज्यामुळे त्यांना बॅक्टेरियामुळे संसर्ग होणाचा धोका जास्त असतो.

इतकेच नाही तर किचन मधील कपड्यांना देखील वेगळे धुतले पाहिजे कारण जर आपण किचनमधील कपड्यांना इतर कपड्यांसोबत एकत्र धुतले तर त्याचा प्रभाव देखील आपल्या कपड्यांवर पडू शकतो. किचनच्या कपड्यांद्वारे हे बॅक्टेरिया कोणत्याना कोणत्या प्रकारे आपल्या पोटापर्यंत पोहोचू शकतात.

याचबरोबर प्रत्येक कपड्यांसाठी वेगवेगळे डिटर्जंट देखील असतात. अशामध्ये अंडरगार्मेंट्ससाठी नेहमी सॉफ्ट प्रोडक्ट्सच वापरायला हवेत. यामुळे अंडरगार्मेंट्स कधीची इतर कपड्यांसोबत धुवू नयेत आणि कोणतेही अंडरगार्मेंट्स चोवीस तासांपेक्षा जास्त वापरू नयेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने