शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो. या खास दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण श्रद्धेने पूजा केल्यास घरामध्ये सुख शांतीचा वास होतो. त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने देखील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते.

शुक्रवारच्या दिवशी हे करू नये: देवी लक्ष्मी त्याच स्थानी निवास करते जिथे स्वच्छता असते. याशिवाय जे लोक स्वच्छ वस्त्रे परिधान करतात त्यांच्यावर देखील देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी होते. फाटलेले आणि अस्वच्छ वस्त्रे परिधान केल्याने राहू अशुभ होतो आणि आयुष्यामध्ये अनेक समस्या येतात. यामुळे स्वच्छतेकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे.

कोणत्या वस्तू शुक्रवारी खरेदी कराव्यात: शुक्रवारच्या दिवशी वस्त्र, वाहन, गॅझेट्स, दागिने, साखर, मिठाई, शृंगाराचे सामान इत्यादी वस्तू खरेदी कराव्यात. असे मानले जाते कि या वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

शुक्रवारच्या दिवशी काय करावे: शुक्रवारच्या दिवशी घराच्या मेन गेटवर तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. अशी मान्यता आहे कि रात्रीच्या वेळी देवी लक्ष्मी भ्रमण वर निघते आणि ज्या घरांच्या मेन गेटवर दिवा लावलेला असतो त्या घरामध्ये प्रवेश करते. असे केल्याने घरामधील नकारात्मकता उर्जा देखील दूर होते.

दान करावे: शुक्रवारच्या दिवशी दान केल्याने देखील देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. शुक्रवारच्या दिवशी कुमारिकांना किंवा सौभाग्यवती स्त्रियांना सुहागच्या वस्तू भेट कराव्यात. गरजू लोकांना कपडे किंवा भोजन द्यावे.

देवी लक्ष्मीची पूजा: शक्य असल्यास शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे विधी पूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि कमळ आणि गुलाबाचे फुल अर्पण करावे. पूजेनंतर देवी लक्ष्मीची आरती देखील जरूर म्हणावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने