आचार्य चाणक्यने आपल्या नीतीशास्त्राच्या ११ व्या अध्यायामध्ये लिहिलेल्या पहिल्या श्लोकामध्ये मनुष्याच्या ४ गुणांचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे कि हे गुण मनुष्याच्या आतमध्ये जन्मापासूनच त्याला प्राप्त झालेले असतात. हे गुण ज्यांच्यामध्ये असतात ते कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये सहजपणे सफलता मिळवतात. व्यक्ती या गुणांमुळे नोकरी-व्यापारमध्ये सफलता मिळवतो. चला तर पाहूयात ते कोणते गुण आहेत.

दान देण्याच्या इछेचा गुण जन्मापासूनच व्यक्तीच्या स्वभावामध्ये असतो. ज्याचा स्वभाव दानी नसतो त्याची इच्छा असून देखील तो या गुणाला आत्मसात करू शकत नाही. हा असा गुण आहे जो कोणीही शिकवून आत्मसात करू शकत नाही. हा व्यक्तीच्या स्वभावावर पूर्णपणे अवलंबून असतो.

संयम किंवा सहनशीलता हि व्यक्तीच्या जन्मापासूनच त्याच्यामध्ये असते. व्यवहारामध्ये याला रक्तामध्ये असणे म्हणतात. या गुणांमध्ये विकास केला जाऊ शकतो. पण याला अभ्यासाद्वारे निर्मित केले जाऊ शकत नाही. संयम ठेवणे सर्वात उत्कृष्ठ गुण आहे. हा तोच गुण आहे ज्यामुळे व्यक्ती काठीनातल्या कठीण परिस्थितीमधून देखील सहजपणे बाहेर पडू शकतो.

चाणक्यने मधुर वाणीला देखील या गुणांमध्ये सामील केले आहे. हा गुण व्यक्तीच्या स्वभावाच्या अंतर्भूत असतो. सध्याच्या युगामध्ये हा आनुवंशिक गुण म्हणून ओळखला जातो. आपण याला विकसित करू शकतो. वातावरण या गुणाला थोडेफार उत्कृष्ठ बनवू शकते.

चाणक्यने या श्लोकामध्ये चौथ्या गुणाच्या रूपाने उचित किंवा अनुचित ज्ञानाला देखील सामील केले आहे. ते म्हणतात कि उचित आणि अनुचितमध्ये फरक करण्याचा गुण व्यक्तीच्या आतमध्ये जन्मापासूनच असतो, याला अभ्यासाने प्राप्त केले जाऊ शकत नाही.

तर हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेयर करायला विसरू नका. तुमच्याजवळ असे काही लेख असल्यास आम्हाला आमच्या ईमेल वर पाठवू शकता. आम्ही तुमच्या नावासोबत शेयर करू.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने