आपल्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या केसांचे वेगवेगळे काम असते. ठीक अशाप्रकारे आपल्या नाकामध्ये देखील केस असतात. आजच्या काळामध्ये लोक डोक्याचे केस, दाढी, डोळे, आयब्रो आणि मिशांचे केस सोडून शरीरावर इतर ठिकाणी केस पसंत करत नाहीत. पण त्यांना माहिती नसते कि हे केस आपल्या सुरक्षेसाठी असतात. तसे तर स्त्रिया आपले सौंदर्य वाढवण्यासाठी शरीरावरील सर्व केसांना वॅक्सिंग करून काढून टाकतात.

त्यांच्यासाठी चालू शकते पण पुरुषांच्या बाबतीत असे नसते. कारण केस पुरुषांची शान असतात. आज आम्ही नाकाच्या केसांबदल जाणून घेणार आहोत कि, नाकातील केस काढावे कि नाहीत. यामुळे कोणता फायदा होतो आणि कोणते नुकसान होते आणि जर नाकातील केस कापायचे असतील तर सर्वात सोपा आणि चांगला मार्ग कोणता आहे. या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि नाक नेहमी स्वच्छ कसे ठेवावे हे देखील जाणून घेणार आहोत.

नाकातील केसांचे फायदे

आपण सर्व लोक श्वास घेण्यासाठी हवेला नाकाद्वारे आपल्या शरीरामध्ये घेत असतो. ज्यासोबत बाहेरचे प्रदूषण, धूळ, बॅक्टेरिया, दुर्गंधी किंवा कोणतेही खराब तत्व देखील आपल्या नाकाद्वारे शरीरामध्ये जाते. ज्यामुळे आपल्याला इन्फेक्शन, अॅलर्जी किंवा एखादा आजार होतो. पण आपल्या नाकातील केस एक फिल्टर म्हणून काम करतात. जे हवेसोबत आलेले प्रदूषण, धूळ, माती, बॅक्टेरिया, दुर्गंधी किंवा खराब तत्व फिल्टर करून फक्त स्वच्छ हवा शरीरामध्ये जाऊ देतात.

म्हणजे आपल्या नाकातील केस खराब तत्वांना बाहेरच रोखून धरतात आणि स्वच्छ हवा आतमध्ये जाऊ देतात. पण अनेक लोक असे देखील असतात ज्यांचे नाकातील केस खूपच वेगाने वाढतात आणि ते नाकाच्या बाहेर येऊ लागतात आणि हे खूपच वाईट दिसते. जर तुमचे नाकातील केस नाकाच्या बाहेर येत असतील तर ते जरूर कापावेत अन्यथा ते आपल्या चेहर्या चे सौंदर्य खराब करतात.

नाकातील केस कापण्याची पद्धत

आपल्याला फक्त नाकातील बाहेर आलेले केसच कापायला हवेत, आतले केस कापू नयेत. म्हणून कात्रीच्या मदतीने बाहेर आलेले केस कापू शकता आणि आपल्या अशा अनेक नसा असतात जे आपल्याला वास घेणे आणि जाणीव करणे किंवा एक सेंसर म्हणून काम करतात आणि या नसा थेट आपल्या मेंदूशी जोडलेल्या असतात म्हणून नाकातील केस कापतेवेळी काळजीपूर्वक कापावेत.

ट्विजर्स एक छोटा चिमटा असतो ज्याच्या मदतीने तुम्ही नाकातील केस खेचून बाहेर काढू शकता. हा देखील चांगला उपाय आहे. जर तुमच्या नाकातील केस बाहेर आले असतील तर ट्विजर्सच्या मदतीने ते तुम्ही काढू शकता.

याशिवाय इतर अनेक पद्धती देखील आहेत जसे नोज ट्रिमर, वॅक्सिंग किंवा लेजर ट्रीटमेंट. पण आम्ही या ट्रीटमेंट वापरण्याचा सल्ला नाही देणार, कारण आपल्याला नाकाच्या बाहेर आलेले केसच साफ करायचे आहेत. तर या ट्रीटमेंट नाकाच्या आतील केस साफ करण्यासाठी वापरल्या जातात. यामुळे नाकाच्या आतमध्ये एक देखील केस राहणार नाही आणि नंतर आपल्या समस्या येतील. यामुळे कात्रीच्या मदतीने फक्त बाहेरीलच केस कापावेत.

नाकाच्या आतमधील घाण साफ करण्याची पद्धत

आपल्या नाकाच्या आतमध्ये असलेले केस दिवसभर खूपच घाण साठवून ठेवतात जे काढून टाकणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुम्ही आपल्या हातामध्ये पाणी घेऊन नाकाद्वारे पाणी आतमध्ये खेचून पुन्हा बाहेर काढावे. असे तीन चार वेळा करावे. यामुळे आपल्या नाकातील सर्व घाण साफ होईल आणि जर तुम्हाला अॅडव्हान्स योगा करायचा असेल तर तुम्हीं नाकाद्वारे पाणी खेचून तोंडाद्वारे बाहेर काढू शकता किंवा तोंडातून पाणी घेऊन नाकाद्वारे काढून शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने