ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांद्वारे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याविषयी जे सांगितले जाते तसेच त्याचे अंदाज लावले जातात. त्याच प्रकारे सामुद्रिक शास्त्रात शरीराचे अवयव, त्याचे आकार, हे त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगत असतात.

सामुद्रिक शास्त्रात मानवी शरीराच्या प्रत्येक भागाबद्दल असे नमूद केले आहे की अवयवाचा आकार व प्रकार याचा त्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असतो. आज आम्ही तुम्हाला मानवी नाकाशी सं-बंधित सामुद्रिक शास्त्राबद्दल सांगणार आहोत.

पोपटासारखे नाक: सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्याचे नाक पोपटासारखे असेल तर त्या व्यक्तीचे भविष्य खूप उज्ज्वल असते, नेहमीच त्याचे नशिब चांगले असते. या व्यतिरिक्त असे व्यक्ती ज्या क्षेत्रात काम करतात त्या ठिकाणी ते उच्च पदावर जात असतात. अशा लोकांच्या वागण्याबद्दल बोलले तर असे लोक खूप हुशार आणि संवेदनशील असतात. हे लोक इतरांचे सुख आणि दुःख चांगल्याप्रकारे समजतात.

मोठे नाक: ज्या लोकांचे नाक मोठे आहे त्यांचे आयुष्य अगदी विलासी आणि श्रीमंती मध्ये होते किंवा असे म्हणतात की हे लोक खूप आनंददायक जीवन जगतात. असे लोक बहुतेक इतरांची काळजी करत नसतात. त्यांना इतरांच्या भावनांचे काही देणेघेणे नसते ते केवळ आपल्या स्वतःच्या सुख सुविधांसाठी आयुष्य जगत असतात.

सरळ नाक: ज्या लोकांचे सरळ नाक आहे असे लोक खूप धार्मिक स्वभावाचे असतात, त्यांचे जीवन अगदी साधे सरळ सोपे असते, या लोकांना धार्मिक कार्यात भाग घेणे आवडत असते म्हणून अशा लोकांना धार्मिक कार्य करण्यास कधीही विरोध करू नये.

वाकलेले नाक: सामुद्रिकशास्त्रात असे म्हणले आहे की ज्यांचे नाक थोडे वाकलेले असते त्यांच्या जीवनात पैशाशी सं-बंधित कोणतीही समस्या कधीच येत नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य धन संपत्तीने भरलेले असते, त्याशिवाय जर अशा व्यक्तींच्या नाकाचे छिद्र लहान असतील तर त्यांच्यासाठी हे अधिक शुभ असल्याचे सिद्ध होते. हे लोक त्यांच्या जीवनात कमी प्रयत्न करून देखील यशस्वी होतात.

खूप छोटे किंवा खूप मोठे नाक: सामुद्रिक शास्त्रानुसार खूप मोठे आणि खूप लहान नाक देखील योग्य नाही, अशा लोकांच्या जीवनात दारिद्र्य कायम राहण्याची शक्यता असते. त्यांना सर्वकाळ पैशाच्या कमतरतेतून जावे लागते. हे लोक त्यांच्या आयुष्यात कितीही प्रयत्न करीत असले तरी त्यांच्याकडे म्हणावे तसे पैसे येत नाहीत.

वाकलेले आणि चपटे नाक: ज्या व्यक्तींचे नाक थोडे चपटे आणि वाकलेले असते अशा व्यक्तींचा स्वभाव शांत असतो. त्यांचा भोळा व शांत स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतो. या व्यतिरिक्त ते खूप मदतशीर देखील असतात. या व्यक्तींचा असा चांगला स्वभाव हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने