तुम्ही कधी नागा साधूंना साक्षात किंवा टीव्हीवर पाहिले असेल. कुंभ मेळ्यामध्ये हजारोंच्या संखेने नागा साधू पाहायला मिळतात. नागा साधू आपल्या शरीरावर कधीच कपडे घालत नाहीत आणि शरीरावर राख लावून ठेवतात. नागा साधूंच्या या विचित्र प्रकाराने सर्वच हैराण होतात आणि सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न तर येतच असेल कि नागा साधू असे का करतात. ते कधीच कपडे का नाहीत घालत आणि शरीरावर नेहमी राख का लावून ठेवतात. चला तर जाणून घेऊया.

नागा शब्दाचा अर्थ: नागा शब्दाचा अर्थ न-ग्न असा होतो. नागा साधू न-ग्न अवस्थेमध्ये राहतात. हे देवाच्या भक्तीमध्ये इतके तल्लीन होतात कि यांना आपल्या शरीराला झाकण्यासाठी कपड्यांची आवश्यकता देखील पडत नाही आणि ते नेहमी आपल्या शरीरावर राख लावून ठेवतात.

कुटुंब: नागा साधूंना कोणतेही घर, कुटुंब काहीच नसते आणि हे नेहमी आपल्या समुदायालाच आपले कुटुंब मानतात आणि त्यांच्यासोबतच देवाच्या भक्तीमध्ये आपले आयुष्य घालवतात. यांना कुटुंब, नातेवाईक यांच्याशी काही देणेघेणे नसते.

राहण्याचे ठिकाण: नागा साधू हे कधीच आलिशान घरामध्ये राहत नाहीत. ते नेहमी समुदायाने एक साधारण झोपडी बनवून त्यामध्ये आपले आयुष्य व्यतीत करतात. यांना स्वतःचे असे निश्चित घर नसते आणि ते कधीच आलिशान जीवन जगण्यावर विश्वास ठेवत नाहीत.

नागा साधू काय खातात: नागा साधू तीर्थयात्रेकरुंच्याद्वारे दिले गेलेले भोजन खातात. यांना कोणतेही दैनंदिन भोजन करण्याचे महत्व वाटत नाही. हे फक्त आपल्या देवाच्या भक्तीमध्ये लीन होतात आणि तीर्थयात्रेकरुंच्याद्वारे दिले गेलेले भोजनच ग्रहण करतात. हे कधीच कोणत्याही भोजनाला जास्त महत्व देत नाहीत जे मिळेल त्यामध्ये समाधानी राहतात.

कपडे न घालण्याचे कारण: नागा साधू नेहमी विनाकपड्याचे पाहायला मिळतात. नागा साधूंचे असे म्हणणे आहे कि कपडे शरीर झाकण्याचे काम करतात. ज्यांना आपल्या शरीराची सुरक्षा करायची असते असे लोक कपडे परिधान करतात आणि आमच्यासाठी शरीराच्या सुरक्षेला कोणतेही महत्व नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने